59 वर्षांनंतर ‘या’ सहा ग्रहांची युती; जाणून घ्या तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?

तब्बल 59 वर्षानंतर हे सहा ग्रह एकाच राशीच आले आहेत. या षटग्रही योगामुळे प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होणार आहे. | february horoscope

59 वर्षांनंतर 'या' सहा ग्रहांची युती; जाणून घ्या तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?
राशीभविष्य
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 5:17 PM

मुंबई: फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रहांच्या स्थित्यंतरातून एक अनोखा योग साधला जाणार आहे. 9 फेब्रुवारीला चंद्र मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे आता मकर राशीत सूर्य, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि चंद्र असे सहा ग्रह एकत्र येणार आहेत. तब्बल 59 वर्षानंतर हे सहा ग्रह एकाच राशीच आले आहेत. या षटग्रही योगामुळे प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होणार आहे.

मेष- या राशीसाठी सहा ग्रहांची युती अत्यंत फलदायी ठरणार आहे. नवीन नोकरी, प्रोजेक्ट, नव्या लोकांच्या भेटीगाठी आणि प्रवासाचा योग संभवतो. घरातील वडिलधाऱ्यांकडून मोठे सहकार्य लाभेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे मार्गे लागतील. यश आणि प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

वृषभ- या राशीच्या व्यक्तींसाठीही ही ग्रहस्थिती फलदायी ठरेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग वाढेल.

मिथुन- मिथुन राशीच्या व्यक्तींना या ग्रहस्थितीची शुभ फळे मिळतील. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होईल. मात्र, थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. घरात शांती राहील. जोडीदार आणि कुटुंबीयांशी असलेले संबंध दृढ होतील. एखादी शुभवार्ता कानावर पडण्याची शक्यता.

कर्क- सहा ग्रहांच्या युतीमुळे कर्क राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय होऊ शकतो. ही चांगल्या घटनांची नांदी ठरेल. तुमच्या समस्या दूर होतील. आरोग्य सुधारेल. शत्रूंच्या कारवायांना परस्पर आळा बसेल. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे, वादात पडणे टाळा.

सिंह- सिंह राशीच्या व्यक्तींना मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि व्यापारात सफलता मिळेल. नशीबाची साथ मिळेल. जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता. जमीनजुमल्याचे व्यवहार करणे टाळा.

कन्या- ही ग्रहस्थिती कन्या राशीच्या व्यक्तींनाही फलदायी ठरणार आहे. एखादी मोठा गोष्ट पूर्णत्त्वाला जाईल. आर्थिक स्थिती सुधारले. स्वप्नपूर्तीसाठी उत्तम काळ. वैवाहिक जीवनात सौख्य नांदेल. मात्र, दुर्घटनेपासून सावध राहा, आरोग्याची काळजी घ्या.

तूळ- तूळ राशीच्या व्यक्तींना या ग्रहमानाची संमिश्र फळे मिळतील. हाती घेतलेले काम संथगतीने पुढे जाईल. घाईगडबड तोट्याची ठरू शकते. नोकरी बदलताना सावधगिरी बाळगा. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक- वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ तणावाचा ठरू शकतो. आरोग्याची काळजी घ्या, चिडचिड कमी करा. स्वत:वर नियंत्रण ठेवा. शेअर बाजार किंवा प्रॉपर्टीचे व्यवहार करताना सावध राहा.

धनु- धनु राशीच्या व्यक्तींसाठीही हे ग्रहमान संमिश्र असेल. कुटुंबीय तुमच्या पाठिशी उभे राहतील पण बाहेरील व्यक्तींशी वाद होतील. तणाव आणि निद्रानाशामुळे समस्या वाढतील. मात्र, नव्या कार्याची सुरुवात करण्यास उत्तम ग्रहमान.

मकर- सहा ग्रहांच्या युतीमुळे मकर राशीच्या व्यक्तींना व्यवसायात मोठा फायदा होईल. बुद्धी आणि विवेकाने वागलात तर मोठे यश मिळवाल. रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होतील. नोकरीत बढतीचा योग संभवतो.

कुंभ- या राशीच्या व्यक्तींना सावध राहण्याची गरज. वरिष्ठांकडून दबाव वाढू शकतो. व्यावसायिक आणि आर्थिक समस्या निर्माण होतील. पैशाचे व्यवहार करण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला घ्या.

मीन- मीन राशीच्या व्यक्तींसाठीही हे ग्रहमान शुभ ठरेल. समस्यांमुळे आलेला तणाव कमी होईल. मुलांचे मन अभ्यासात रमेल. खर्च कमी होतील.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.