VIDEO : अकल बडी की भैंस; या म्हशीचा कारनामा वाचून तुम्हीही म्हणाल…?

VIDEO : अकल बडी की भैंस; या म्हशीचा कारनामा वाचून तुम्हीही म्हणाल...?

नुकतंच एका म्हशीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Buffalo Breaks Free From His Chain Video Viral)

Namrata Patil

|

Feb 12, 2021 | 6:07 PM

मुंबई : सोशल मीडियावर जगभरातील अनेक प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकतंच एका म्हशीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओला हजारो व्यक्तींनी लाईक्स केले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी हसू आवरले नाही. (Buffalo Breaks Free From His Chain Video Viral)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ एक म्हैस दिसत आहे. या म्हशीला एका लोखंडी साखळीच्या मदतीने लाकडी खुंटाजवळ बांधण्यात आलं होतं. मात्र या म्हशीने मोठ्या हुशारीने ती साखळी सोडवली आहे. या म्हशीने ती लोखंडी साखळी तोंडात पकडली आणि त्यानंतर ती साखळी हळूच वरच्या बाजूने सरकवली. त्यामुळे तिची त्यापासून सुटका झाली.

म्हैस या प्राण्याला अक्कल नसते, असा गैरसमज असतो. मात्र हा व्हिडीओ बघितल्यानंतर लोकांचा गैरसमज दूर होऊ शकतो. हा व्हिडीओ पंकज जैन या आईपीएस अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केला आहे. अकल बडी की भैस अशी एक गमतीशीर म्हण आहे. त्या अधिकाऱ्याने या व्हिडीओला हेच कॅप्शन दिले आहे.

हा व्हिडीओ 10 जानेवारीला शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 48 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 5 हजार लाईक्ससह 900 वेळा हा व्हिडीओ रिट्वीट करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली अनेक गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत.

(Buffalo Breaks Free From His Chain Video Viral)

(Buffalo Breaks Free From His Chain Video Viral)

संबंधित बातम्या : 

FACT CHECK | अ‌ॅमेझॉन नदीला सोनेरी रंग, खरंच नदीमध्ये सोन दडलंय?, जाणून घ्या फोटोमागचं सत्य

नोकरी सोडली, घरच्या छतावर केसरची शेती, लाखो कमवले, शेतकऱ्याची पोरं लय भारी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें