AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FACT CHECK | अ‌ॅमेझॉन नदीला सोनेरी रंग, खरंच नदीमध्ये सोन दडलंय?, जाणून घ्या फोटोमागचं सत्य

अ‌ॅमेझॉनचे पात्राला अचानकपणे सोन्याचा रंग अल्यामुळे अनकेजण चकीत झाले आहेत. (Amazon river golden colour photos)

FACT CHECK | अ‌ॅमेझॉन नदीला सोनेरी रंग, खरंच नदीमध्ये सोन दडलंय?, जाणून घ्या फोटोमागचं सत्य
अ‌ॅमेझॉन नदी अशा प्रकारे सोनेरी दिसत आहे.
| Updated on: Feb 12, 2021 | 11:18 AM
Share

ब्राझीलिया : अ‌ॅमेझॉन नदी (Amazon river) ही जगातील सर्वात दुसरी मोठी नदी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या पात्रात असलेली जैवविविधता, नदीपात्राच्या बाजूला असलेल्या जंगलातील वैविध्यपूर्ण प्राणी यामुळे ही नदी नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. मात्र, अ‌ॅमेझॉनच्या पात्राला अचानकपणे सोन्याचा रंग अल्यामुळे अनकेजण चकीत झाले आहेत. अ‌ॅमेझॉन नदीमध्ये सोनं दडलंय असं असं अनेकांना वाटायला लागलं आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.    (Amazon river turns into golden colour photos gone viral on social media)

नेमका प्रकार काय?

सोशल मीडियावर काही फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अ‌ॅमेझॉन नदीचे पात्र सोनेरी रंगाचे दिसत आहे. पाण्यामध्ये सोनं असल्याचा भासही या फोटोंना पाहून होतोय. व्हायरल झालेले फोटो हे खरे आहेत. मात्र, अ‌ॅमेझॉन नदीमध्ये सोने नसून नदीच्या पात्रात केलेल्या खड्ड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धातू जमा झाले आहेत. त्यामुळे अ‌ॅमेझॉनचे पात्र सोनेरी रंगाचे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने (ISS) अंतराळातून घेतले आहेत. NASA च्या अर्थ ऑब्झर्रव्हेटरी वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार हे फोटो पेरु (Peru) येथील माड्रे डे डिओस (Madre de Dios) राज्यातील आहेत. या वेबसाईटने सांगितल्याप्रमाणे नदीपात्राला आलेला सोनेरी रंग हा नदीत तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये सूर्यप्रकाश (Sunlight) पडल्यामुळे आला आहे. त्यामुळे हे पाणी सोनेरी रंगाचे दिसत आहे.

या कारणामुळे नदी सोनेरी झाली

अ‌ॅमेझॉनची नदी अचानकपणे सोनेरी झाल्यामुळे सगळेच चकीत झाले आहेत. काहींना या नदीमध्ये सोन्याचा साठा असल्याचे वाटत आहे. मात्र सत्य वेगळेच आहे. अ‌ॅमेझॉन नदीच्या किनाऱ्यावर सोन्याचा शोध घेण्यासाठी अनेक खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे या खड्डयांमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती वाढल्या आहेत. काही खड्ड्यांमध्ये तर शेवाळसुद्धा तयार झाले आहेत. सोन्याच्या शोधात खोदलेल्या या खड्ड्यांमध्ये अनेक प्रकारचे धातून जाऊन बसले आहेत. यामध्ये काही सोन्याचे कणदेखील आहेत. त्यामुळे कदाचित हे पाणी सोनेरी दिसत असावे असाही तर्क बांधला जातोय.

संबंधित बातम्या :

Fact Check : फोटोग्राफरनं नवरीला टच केलं, नवऱ्यानं कानाखाली ठेवली, खरंच असं घडलं?

डोक्याजवळ आणखी एक डोकं आलं? हा रोग आहे की आणखी काही? डॉक्टर कसा करणार इलाज?

प्रसिद्ध ब्रँडेड टॉपचे अनोखे डिझाईन, किंमत पाहून व्हाल हैराण?

(Amazon river turns into golden colour photos gone viral on social media)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.