Fact Check : फोटोग्राफरनं नवरीला टच केलं, नवऱ्यानं कानाखाली ठेवली, खरंच असं घडलं?

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Feb 10, 2021 | 9:01 AM

हा व्हिडीओ कुठला आहे, ती नवरी कुठली आहे, असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.

Fact Check : फोटोग्राफरनं नवरीला टच केलं, नवऱ्यानं कानाखाली ठेवली, खरंच असं घडलं?

मुंबई : लग्नसोहळ्यात नवरामुलगा रागवल्यानंतर नवरीच्या खळखळून हसण्याचा (Fact Check Of Bride Laugh On Groom Slaps Photographer) एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे. यामध्ये फोटो काढताना फोटोग्राफर नवरीला वारंवार स्पर्श करत होता. हे पाहून नवरदेवाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने फोटोग्राफरच्या कानशीलात लगावली. हे बघताच नवरी खळखळून हसू लागली (Fact Check Of Bride Laugh On Groom Slaps Photographer).

नेमकं काय घडलं?

लग्न झाल्यानंतर वराला बाजूला सारत नवरीचा क्लोजअप फोटो काढण्याच्या नादात फोटोग्राफरला चांगलाच दणका बसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 45 सेकंदांचा हा व्हीडीओ 5 फेब्रुवारी रोजी सोशल मीडीयावर अपलोड झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही.

बरं फोटोग्राफरने नवरदेवाचा मार खाल्ल्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत नाहीये. तर फोटोग्राफरने मार खाल्ल्यानंतर नवरीच्या खळखळून हसण्याचे आख्खे नेटीझन्स दिवाणे झाले आहेत. नवरीच्या हसण्यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आपल्या नवऱ्याने फोटोग्राफरला मारल्याचे कळताच तिने मंचावरच पोट खळखळून हसायला सुरुवात केली. तिचे हे हसणे बाजूच्या एकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकले नसले तरी नवरीच्या दिलखुलास हसण्यामुळे हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

नवरीच्या हसण्याने नवरदेव, फोटोग्राफराच राग गुल्ल

आपल्या नवऱ्याने फोटोग्राफरला मरलं हे समजल्यानंतर व्हिडीओमध्ये नवरी अगदीच मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे. हसणे न आवरल्यामुळे ती लग्नाच्या मंचावरच बसून पोट धरून हसत आहे. तिचे हेच हसणे बघून तिच्या नवऱ्याचाही राग पळून गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. सुरुवातीला रागात असलेला नवरदेव नवरीचे हसणे बघून नंतर तोही हसताेय. तर दुसरीकडे चोप बसलेल्या कॅमेरामॅनलासुद्धा आपले हसणे आवरलेले नाही. तोही नवरीसोबत हसताना दिसत आहे (Fact Check Of Bride Laugh On Groom Slaps Photographer).

Fact Check

हा व्हिडीओ एका सिनेमाच्या शूटिंगचा भाग आहे. छत्तीसगढची अभिनेत्री अनिक्रिती चौहानने कमेंट केलं आहे की, “हा माझ्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा व्हिडीओ आहे”.

हा व्हिडीओ ‘डार्निंग प्यार झुकता नही’ नावाच्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला.

Fact Check Of Bride Laugh On Groom Slaps Photographer

संबंधित बातम्या :

VIDEO : पाकिस्तानच्या प्रसिद्ध गायकाकडून अमानुष कृत्य, भावजयला मारहाण, चाहत्यांकडून टीकेची झोड

तुला कापू का विचारल्यावर कोंबडी चक्क नको म्हणाली, VIRAL व्हीडिओ पाहून पोट धरून हसाल

…आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नृत्य करण्यापासून स्वत:ला रोखू शकल्या नाहीत

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI