ड्रायव्हरचा गाडीच्या वेगावरचा ताबा सुटला, थेट क्रॅश बॅरियरवर कार चढली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

जगात कलाकारांची कमी नाही. कोण कधी कोणत्या ठिकाणी आपल्या कलाकृतीचं दर्शन घडवेल याचा काहीच अंदाजच बांधता येणार नाही (Car stuck on crash barrier photo goes viral).

ड्रायव्हरचा गाडीच्या वेगावरचा ताबा सुटला, थेट क्रॅश बॅरियरवर कार चढली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 6:04 PM

शिमला : जगात कलाकारांची कमी नाही. कोण कधी कोणत्या ठिकाणी आपल्या कलाकृतीचं दर्शन घडवेल याचा काहीच अंदाजच बांधता येणार नाही. काही कलाकार अशी काही कामगिरी करुन दाखवता की पाहणारी प्रत्येक व्यक्ती चक्रावून जाते. असाच काहीसा प्रकार हिमाचल प्रदेशात बघायला मिळाला. मंडी जिल्ह्याच्या सरकाघाट परिमंडळ परिसरात फ्लाईंग कारचं अनोखं दृश्य बघायला मिळत आहे. या कारचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार चालकाने रस्त्यापासून 3 फूट उंच असलेल्या क्रॅश बॅरिअरवर कार चढवून चर्चेला निमंत्रण दिलं आहे. ही कार बघून प्रत्येकाच्या मनात कार नेमकी तिथे गेली कशी? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय (Car stuck on crash barrier photo goes viral).

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना ही बुधवारी (24 जून) दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. एक ऑल्टो कार नेरचौक पासून धर्मपूरच्या दिशेला जात होती. कारला एक व्यक्ती चालवत होती. त्याच्या शेजारीच त्याची लहान मुलगी बसली होती. जबोठ पूल जवळ ही कार पोहोचली तेव्हा एका हलक्या वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार चक्क तीन फुट उंच असलेल्या क्रॅश बॅरियरवर चढली. सुदैवाने ती कार तिथेच थांबली. तिथून जर कार पलटी झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती (Car stuck on crash barrier photo goes viral).

क्रॅश बॅरियरवर कार बघून लोकंही चक्रावले

या दुर्घटनेतून कार चालक आणि त्याची मुलगी सुदैवाने बचावले. पण कार बॅरियरवरच लटकलेली राहिली. आता रस्त्याने येणारे-जाणारे लोकं ही कार बघायचे तेव्हा चक्रावून जायचे. ही कार नेमकी क्रॅश बॅरियरवर अशी उभी कोणी केली? तिला खरंच असं कुणीतरी मुद्दामूल उभं केलं की आणखी काही घडलंय? पण घडलंच तर नेमकी अशीच कशी ही कार उभी? असे नानाविध प्रश्न रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मनात येऊ लागले.

नेमकं काय घडलं होतं?

दरम्यान, जबोध ग्रामपंचायतचे सरपंच रवि राणा यांनी या घटनेची माहिती दिली. जिथून क्रॅश बॅरियरची सुरुवात होते, अगदी तिथेच ही घटना घडली आहे. या क्रॅश बॅरियरची एक बाजू जमिनीला जोडली गेली आहे. कार त्याचमार्गाने क्रॅश बॅरिअरवर चढली आणि पुढे काही अंतरावर थांबली, असं रवि राणा यांनी सांगितलं. दुसरीकडे या दुर्घटनेत कारचालक आणि त्याच्या मुलीचा जीव बचावल्याने स्थानकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.

सरकाघाट उपमंडळ परिसरातील अशा प्रकारच्या कार अपघाताची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वेळी तर एका कार चालकाने घराच्या छतावर कार चढवली होती. कारच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने तसा अपघात घडला होता. या घटनेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा : Video : जंगलातून जात होता दुचाकीस्वार, समोर आली तीन अस्वलं, पुढे काय झालं…

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.