कोणत्या प्रोफेशनमधील लोक असतात सर्वाधिक धोकेबाज?, नाव ऐकून धक्का बसेल; गुप्तहेर महिलेचा दावा काय?
मॅडलिन स्मिथ नावाच्या महिलेने विश्वासघात करणाऱ्या पुरुषांचा पर्दाफाश करण्यासाठी अनोखी पद्धत वापरली आहे. ती अशा पुरुषांची पोलखोल करून त्यांच्या भागीदारांना पुरावे पुरवते आणि त्याबद्दल मोबदला घेते. तिच्या अनुभवांनुसार, पोलीस, अग्निशमन दल, पॅरामेडिक्स, सैनिक आणि जिम ट्रेनर्स हे सर्वाधिक विश्वासघात करणारे पेशे असल्याचे ती सांगते.

जगात अनेक लोक वेगवेगळ्या प्रकाराने पैसे कमावत असतात. वेगवेगळ्या व्यवसायात आपला जम बसवतात. पण एखाद्या व्यवसाय किंवा नोकरीचा त्या व्यक्तीच्या स्वभावाशी संबंध असू शकतो का? अमूक पेशातील लोक धोकेबाज असू शकतात? असा तुम्ही कधी विचार करू शकता का? मॅडलिन स्मिथने मात्र तसा संबंध जोडला आहे. तिने तिच्या आपल्या अनोख्या पेशाच्या बाबतची माहिती दिली आहे. ही महिला धोकेबाज पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढते. आणि त्यांची पोलखोल करते. त्यासाठी तिला या धोकेबाज पुरुषांच्या बायका आणि गर्लफ्रेंडकडून मोठी रक्कम मिळते.
मॅडलिन स्मिथ ही धोकेबाज पुरुषांचा पर्दाफाश करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करते. या पुरुषांच्या पार्टनरच्या संशयाला बळकटी मिळावी म्हणून ती हे करत असते. पैसे मिळाल्यावर आपल्या नात्यापासून दूर जाणाऱ्या कोणत्याही पुरुषाला पकडण्याचं ती काम करते.
जासूसी करण्याची मोठी रक्कम
स्मिथ गेल्या तीन वर्षापासून हे काम करत आहे. तिने आतापर्यंत पाच हजार टेस्ट केल्या आहेत. शेकडो पुरुषांना तिने पकडले आहे. त्यांना एक्सपोज केलं आहे. मी नेहमी संधीच्या शोधात असते. महिला मला थेट संपर्क साधतात. मी त्यांच्याकडून 5,614 रुपये शुल्क घेते.
मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवते
त्या बदल्यात मॅडलिन सोशल मीडियावर या महिलांच्या नवऱ्याशी किंवा पार्टनरशी संपर्क साधते. त्यांच्याशी चर्चा करते आणि क्लाइंटला मेसेजचा स्क्रीनशॉट पुरावा म्हणून पाठवते. अधिक हेरगिरी करण्याची ती अधिक रक्कम घेते. माझ्याकडे या कामांची कमतरता नाहीये, असं मॅडलिन म्हणते.
कोणत्या पेशातील लोक चिटर?
कोणत्या पेशातील लोक सर्वाधिक चिटर असतात असं तिला विचारण्यात आलं. त्यावर तिने अनुभवाच्या आधारे थेट भाष्य केलं. पोलीस खात्यातील लोक अधिक बेवफा असतात. अधिक चिटर असतात, असं ती म्हणते. जेव्हा मी काम सुरू केलं, तेव्हापासून आतापर्यंत मी 100 हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांना पत्नी किंवा पार्टनरची फसवणूक करताना पकडलं आहे. माझ्या अनुभवानुसार पोलीस खातं हा सर्वाधिक धोका देणारा पेशा आहे.
100 पोलिसांना पत्नी किंवा पार्टनरशी चिटिंग करताना मी पकडलं आहे. त्यानंतर अग्निशमन दल, पॅरामेडिक्स आणि सैन्यातील पुरुषही धोकेबाज असतात असं तिचं म्हणणं आहे. तर जीम ट्रेनरही या यादीत वरच्या स्थानी असल्याचं ती म्हणते. त्यानंतर वकील, डॉक्टरही धोकेबाज असल्याचा तिचा दावा आहे. जे पुरुष बॉडी एब्स दाखवणारे फोटो शेअर करतात ते धोकेबाज असण्याची शक्यता अधिक असते, असंही तिचं म्हणणं आहे.