AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: दारु पिली आणि सायकल झिंगली, स्टँडअप कॉमेडियन सुनील ग्रोवरकडून तळीरामाचा भन्नाट व्हिडीओ पोस्ट

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मद्यधुंद व्यक्ती सायकल उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा तो सायकल व्यवस्थापित उचलतो, ती उभी करतो, आणि तेवढ्यात तो पेडल करण्याचा प्रयत्न करतो. पण काही अंतरावर गेल्यावर हा सायकलीसह पडतो

Video: दारु पिली आणि सायकल झिंगली, स्टँडअप कॉमेडियन सुनील ग्रोवरकडून तळीरामाचा भन्नाट व्हिडीओ पोस्ट
मद्यपीकडून सायकल चालवण्याचा प्रयत्न
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 6:29 PM
Share

जेव्हा जेव्हा कॉमेडियन सुनील ग्रोव्हर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एखादी पोस्ट शेअर करतात, तेव्हा ती लगेच व्हायरल होते. सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ते अनेकदा त्याच्या चाहत्यांसाठी मजेदार व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एका मद्यपीचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून यूजर्स हसून लोटपोट झाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत सुनील ग्रोव्हरने ‘मिशन इम्पॉसिबल’ असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल. (Comedian Sunil Grover Share a video of a drunk man riding cycle goes viral)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मद्यधुंद व्यक्ती सायकल उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा तो सायकल व्यवस्थापित उचलतो, ती उभी करतो, आणि तेवढ्यात तो पेडल करण्याचा प्रयत्न करतो. पण काही अंतरावर गेल्यावर हा सायकलीसह पडतो, दोन तीन गटांगळ्या खातो, आणि पुन्हा उठण्याचा प्रयत्न करतो. उठण्याची ही प्रक्रिया काहीकाळ सुरु राहते. नीट बघितलं तर व्हिडीओच्या सुरुवातीलाच मद्यपीच्या मागे एक बोर्ड दिसतो, ज्यावर लिहलं आहे, देशी दारुचं दुकान. म्हणजे हे महाशय याच ठिकाणाहून मद्य प्राशन करुन निघाल्याचं कळतं.

पाहा हा व्हिडीओ:

तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला 2 लाख 72 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेत्री आणि बिग बॉस फेम गौहर खान देखील स्वतःला प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकली नाही. कमेंट करताना गौहर खानने लिहिले, हाहाहा, बॅकग्राऊंट म्युझिक भारीच आहे. या व्हिडीओवर नेटकरी खूप कमेंट्स करत आहेत.

एका युजरने नशेत असलेल्या सायकलस्वाराची फिरकी घेत लिहलं, भाऊ, ही सायकलचीच पूर्ण चूक आहे. यासोबतच युजरने स्मायली टाकली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की सुनील ग्रोव्हर हा स्टँडअप कॉमेडियन असण्यासोबतच उत्तम अभिनेता आहे. तो नुकताच तांडव या वेबसिरीजमध्ये दिसला होता.

हेही पाहा:

Video: असा चोर होणे नाही!, चोरीचा हा सीसीटीव्ही पाहून नेटकरी पोट धरुन हसले.

Video: बाहुबली बनण्याच्या नादात “खाली डोकं वर पाय”, तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

 

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.