Video : चिमुकला हत्तीसोबत फुटबॉल खेळायला गेला, पण त्याने फरफटत नेलं, काळजाचा ठोका चुकवणारा 7 सेकंदाचा व्हीडिओ…

एक लहानगा फुटबॉल घेऊन हत्तीजवळ जातो. यानंतर त्याला अपेक्षा असते की हा हत्ती त्याच्यासोबत फुटबॉल खेळेल पण तसं होत नाही. हा चिमुकला हत्तीच्या पायासमोर फुटबॉल ठेवतो. यानंतर हत्ती त्या फुटबॉलला ज्या प्रकारे लाथ मारतो ती पााहून नेटकरी अवाक झालेत.

Video : चिमुकला हत्तीसोबत फुटबॉल खेळायला गेला, पण त्याने फरफटत नेलं, काळजाचा ठोका चुकवणारा 7 सेकंदाचा व्हीडिओ...
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jun 08, 2022 | 4:12 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (social media) विविध व्हीडिओ व्हायरल होत आहेत. आताही असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ आहे फुटबॉल प्रेमी चिमुकल्याचा. तो हत्तीसोबत फुटबॉल खेळाण्यासाठी गेला आहे. त्यानंतर जे झालं त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (viral video) होत आहे.

एक लहानगा फुटबॉल घेऊन हत्तीजवळ जातो. यानंतर त्याला अपेक्षा असते की हा हत्ती त्याच्यासोबत फुटबॉल खेळेल पण तसं होत नाही. हा चिमुकला हत्तीच्या पायासमोर फुटबॉल ठेवतो. यानंतर हत्ती त्या फुटबॉलला ज्या प्रकारे लाथ मारतो ती पााहून नेटकरी अवाक झालेत. हत्ती इतका जोरात फटका मारतो की फुटबॉल सरळ जाऊन त्या चिमुकल्याच्या तोंडावर जाऊन आदळतो. आणि तो लहानगा तिथेच पडतो. यानंतर हत्ती त्या चिमुकल्याचा पाय त्याच्या सोंडेने पकडतो आणि त्याला ओढून नेतो. हा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओला hewanbukansembaranghewan या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं आहे. याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलंय. तर साठ हजारांहून अधिकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट केली आहे.

याआधीही कुत्र्याची आणि एका लहान मुलीचा दोस्ती दाखवणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात कुत्रा एका लहान मुलीची मदत करतोय. तिचं गायीच्या हल्ल्यापासून संरक्षण करतोय. या व्हीडिओत लहान एक लहान मुलगी दिसतेय. तिच्याभोवती गायींचा गराडा पाहायला मिळतोय. या गायी तिच्यावर हल्ला चढवतात. पण इतक्यात तिचा सच्चा यार कुत्रा तिची मदत करतोय. तिचं या गायींपासून संरक्षण करतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by American XL Bully Empire (@xlbully_empire)

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें