AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीमंताचा संघर्ष, 20 रुपयांचा वडापाव खाण्यासाठी तब्बल 15 हजार उडवले; दिल्लीतून थेट विमानाने मुंबईत

दिल्लीतील एका तरुणीची जोरदार चर्चा होत आहे. या तरुणीने 20 रुपयांचा वडापाव खाण्यासाठी तब्बल 15 हजार खर्च केला. या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीमंताचा संघर्ष, 20 रुपयांचा वडापाव खाण्यासाठी तब्बल 15 हजार उडवले; दिल्लीतून थेट विमानाने मुंबईत
Vadapav newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 08, 2026 | 7:42 AM
Share

मुंबईकरांचा वडापाव अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. बहुतांश मुंबईकरांना आठवड्यातून एकदा वडापाव खाण्याचा मोह आवरत नाही. काही जणांचं दररोज वडापाव खाण्याचे ठरलेलं असतंच. याच वडापावची क्रेझ जगभर पसरली आहे. आता दुबईतही वडापाव मिळतो. परंतु मुंबईच्या वडापावची चवच निराळी. अवघ्या 20 रुपयांना मिळणारा वडापाव हा गरीबाची भूक भागवतो. तर श्रीमंतही मोठ्या आवडीने वडापाव खाताना दिसतात. स्वप्ननगरी, मायानगरी असलेल्या मुंबईचा वडापाव खाण्यासाठी दिल्लीतील तरुणीने चक्क 15 हजार रुपये खर्च केले. ती चक्क दिल्लीतून विमानाने मुंबईत आली. त्यानंतर मुंबईतल्या वडापावचा आस्वाद घेतला.

दिल्लीतील तरुणीने मुंबईत जाण्याच्या प्रवासाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने संपूर्ण अनुभव सांगतिला आहे. तिने म्हटलं की, दिल्लीत वडापाव खाल्ला. परंतु तिला चव खास वाटली नाही. त्यामुळे दिल्लीपेक्षा मुंबईत चविष्ट वडापाव मिळू शकतो, असे वाटले. तिने बॅग पॅक केली. त्यानंतर थेट विमानाने मुंबई गाठली.  तिने दिल्लीतून मुंबईला जाण्यासाठी विमानाचं तिकीट आरक्षित केलं. त्यासाठी तिने 5 हजार रुपये मोजले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची वाट पाहत असताना चहा घेतला. त्यासाठी 165 रुपये मोजले. विमानात बसल्यावर नुडल्ससाठी 300 रुपये खर्च केले. मुंबईत जवळपास 7 वाजता पोहोचली. सायंकाळी उशिरा  पोहोचल्यानंतर तिने हॉटेलमधील एका रुममध्ये राहण्यासाठी 4 हजार रुपये मोजले.

दिल्लीतील तरुणी सकाळी हॉटेलमधून बाहेर पडली. तिने ऑनलाइन पदार्थ मागवण्याऐवजी थेट रस्त्यावर पोहोचली. तिने रस्त्यावर 20 रुपयांचा वडापाव खरेदी केला. सकाळचा नाश्ता म्हणत तिने वडापावचा आस्वाद घेतला. या संपूर्ण प्रवासात तिने 15 हजार रुपयांचा खर्च केला. व्हिडिओच्या शेवटी तिने सांगितले की, वडापावचा पहिला घास खाल्ला. मुंबईत सहज वडापाव उपलब्ध होतो. इतके पैसे आणि वेळ खर्च केल्यानंतर मान्य करते की, मी मुंबईत खालेल्ला आयुष्यातील सर्वात बेस्ट वडापाव होता.

View this post on Instagram

दिल्लीतील तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहे. एकाने म्हटलं की, मी एका वडापावसाठी इतका क्रेझी नाही, मला दिल्लीच्या वडापावची आठवण येत आहे’. दुसऱ्याने म्हटलं की, आता वडापाव आवडला नाही, तरी कौतुक करावे लागेल.  कारण एका वडापावसाठी तब्बल 15 हजार खर्च केले आहेत’. तर काहींनी श्रीमंतचा संघर्ष म्हणत ट्रोल केले आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात