Dhinchak Poojaचं नवं गाणं येताच, युजर्स म्हणाले, ‘ताई, देवाला तरी घाबर!’

Dhinchak Poojaचं नवं गाणं येताच, युजर्स म्हणाले, 'ताई, देवाला तरी घाबर!'
नव्या गाण्यानं पुन्हा ट्रोल

Dhinchak Pooja : आपल्या युट्युब चॅनेलवरुन ढिंचॅक पुजानं हे नवं गाणं शेअर केलं आहे. तसंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही हे गाणं लोकांपर्यंत पोहोचवलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 17, 2022 | 9:36 PM

ढिंचॅक पुजा. नाव ऐकूनच अनेकांच्या कानात ‘हाटअटॅक’ येतो. याच ढिंचॅक पुजाचं एक नवं गाणं (New Song) आलंय. हे गाणं पाहून नेहमीप्रमाणे यंदाही अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. ‘I’m a Biker…’ असं ढिंचॅक पुजाच्या गाण्याचं नाव असून अनेकांची तिच्या या नव्या गाण्याची खिल्ली उडवली आहे. रॉयल इनफिल्डवर बसून ‘I’m a Biker…’ म्हणत ढिंचॅक पुजानं (Dhinchak Pooja) तिचं नवं गाण रिलीज केलंय. दरम्यान, आता जे ढिंचॅक पुजाने जे गाणं रिलीज केलंय, त्यात तिला वेगळा आणि हटके अंदाज पाहायला मिळालंय. ढिंचॅक पुजानं भलेही हे गाणं मनापासून बनवलं असेल. पण लोकांनीही तितक्याच मनापासून तिच्या गाण्याची खिल्ली उडवल्यानं हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

देवाला तरी घाबर!

आपल्या युट्युब चॅनेलवरुन ढिंचॅक पुजानं हे नवं गाणं शेअर केलं आहे. तसंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही हे गाणं लोकांपर्यंत पोहोचवलंय. दरम्यान, अनेकांनी या गाण्याला पाहिलं असून या गाण्यावर पुन्हा एकदा प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. एकानं ढिंचॅक पुजाला देवाला तरी घाबर असं म्हटलंय. तर दुसऱ्यानं तिला दुसरं काही काम नाहीये का, असाही प्रश्न विचारलाय. तर एका तिसऱ्यानं ही मुलगी काहीही करु शकते असं म्हणत तिची खिल्ली उडवली आहेत.

युट्युबवर शेअर केलेल्या तिच्या व्हिडीओवर एका पेक्षा एक कमेंट पाहायला मिळत आहेत. दरम्यान, यावेळी ढिंचॅक पुजानं आपल्या गायकीसोबत संगीतावरही बरंच काम केल्याचं काहींना जाणवलंय. पण अजूनही दिल्ली दूर आहे, अशाच आशयाची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. एकूणच सातत्यानं चर्चेत राहिलेल्या ढिंचॅक पुजाला लोकांनी कितीही सुनावलं असलं, तरिही पुन्हा एकदा ती आपलं नवं गाणं घेऊन लोकांच्या भेटीला आहे. या गाण्याची नेहमीप्रमाणेच चर्चा झाली नसती, तरच नवल! झालं देखील तेच.

आता एवढं वाचलंच आहे, तर तिचं गाणंही बघून घेताय ना? पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

Video | ढिंचॅक पूजाच्या नव्या गाण्याची चर्चा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

ढिंच्याक पूजाचं नवं गाणं, नवा अंदाज, लोक म्हणाले, आधी कोरोनाने मारलंय, आता तू तुझ्या आवाजाने नको मारु!


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें