AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझी मुलगी इतकी सुंदर असूच शकत नाही, संशय आला, डीएनए टेस्ट करताच वाढदिवशीच मोठा खुलासा…

व्हिएतनाममधील एका कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या सौंदर्यामुळे शंका आली आणि त्यांनी डीएनए चाचणी केली.चाचणीत धक्कादायक सत्य उघड झाले. त्यांची मुलगी दुसऱ्या कुटुंबाची होती! रुग्णालयातील एका गोंधळामुळे बेबी स्वॅप झाला होता. दोन्ही कुटुंबांना आपल्या मुली मिळाल्या.

माझी मुलगी इतकी सुंदर असूच शकत नाही, संशय आला, डीएनए टेस्ट करताच वाढदिवशीच मोठा खुलासा...
Vietnam ManImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 22, 2025 | 8:13 PM
Share

जगात असंख्य चित्रविचित्र गोष्टी घडत असतात. तुम्ही जर एक गोष्ट शोधायला गेला तर दहा गोष्टी तुमच्यासमोर येतील, इतकं हे जग चित्रविचित्र गोष्टींनी भरलेलं असतं. त्यावर पूर्वी खूप बोललं जात नव्हतं. आता या गोष्टी खूप सामान्य झाल्या आहेत. सांगायचंच झालं तर, डीएनए टेस्टसारख्या गोष्टींवर आधी कोणीही विचारही करत नव्हतं, पण आज ती एकदम सामान्य गोष्ट बनली आहे. याचे काही फायदे असले तरी, नुकसान देखील आहेत.

व्हिएतनामच्या एका व्यक्तीला एक संशय आला. त्याने डीएनए टेस्ट घेतली. त्याची मुलगी प्रचंड सुंदर होती. वाढत्या वयाबरोबर मुलीचं सौंदर्य आणखीनच उठून दिसत होतं. आपली मुलगी इतकी सुंदर असूच शकत नाही, असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याला मनात शंका यायची. ही माझीच मुलगी आहे का? असं त्याला राहून राहून वाटायचं. मग त्याने डीएनए टेस्ट केली आणि जो रिझल्ट आला, त्यामुळे दोघे नवराबायको पार गोंधळून गेले.

शंका आणि धक्का

एका व्यक्तीला त्याच्या किशोरवयीन मुलीच्या सुंदरतेमुळे शंका आली. ही आपलीच मुलगी असू शकते का? असं त्याला वाटलं. मुलगी लहानपणापासूनच अत्यंत सुंदर होती, पण जेव्हा ती मोठी होऊ लागली, तेव्हा वडिलांची शंका अधिक गडद झाली. माझ्या मुलीचा बाप मी नसून दुसरा कोणी असावा असं त्याला वाटलं. अखेर एक दिवस त्याने आपल्या पत्नीला या विषयी बोलून डीएनए टेस्ट करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या बायकोला प्रचंड राग आला. तिने डीएनए टेस्टला स्पष्ट नकार दिला आणि मुलगी दुसऱ्या शहरात घेऊन गेली. त्यानंतर मुलीच्या शाळा सतत बदलत गेल्या आणि आई-वडील हे शोधण्यात गुंतले की त्याच जन्मतारखेला आणखी कोणत्या मुलींचा जन्म झाला होता.

शेवटी उघडकीस आले रहस्य

शाळा बदलताना एक दिवस मुलीची मैत्री एका नव्या शाळेतील मुलीशी झाली. त्यांचा जन्मतारखा सारख्याच होत्या. तिने आपल्या मैत्रीणीला वाढदिवसाला बोलावलं. तेव्हा तिच्या आईचा चेहरा तिच्या मैत्रीणीशी मिळत होता. त्यानंतर डीएनए टेस्ट करण्यात आली. तेव्हा ती तिचीच मुलगी असल्याचं स्पष्ट झालं. या दोन्ही मुलींची हॉस्पिटलमध्ये आदलाबदली झाली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकमेकांशी संबंध वाढवले. आपण मुलींची आदलाबदली करण्याऐवजी मुलींनीच मोठे झाल्यावर कुठे राहायचं हा निर्णय घ्यावा असं दोन्ही कुटुंबांनी ठरवलं. मात्र, हॉस्पिटलच्या या गैरकारभावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला का हे अद्याप त्या कुटुंबाने सांगितलं नाही.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.