कुत्री आणि मांजरांचा हा Viral Video पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘ये लाजवाब है!’

कुत्रा (Dog) आणि मांजर (Cat) हे प्राणी माणसांच्या अगदी जवळ राहणारे आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतोय, यामध्ये मांजर आणि कुत्र्याचा अनोखा खेळ दिसत आहे.

कुत्री आणि मांजरांचा हा Viral Video पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, 'ये लाजवाब है!'
कुत्रा आणि मांजरींचा अनोखा खेळ

कुत्रा (Dog) आणि मांजर (Cat) हे प्राणी माणसांच्या अगदी जवळ राहणारे आहेत. कुत्र्यांना आपण खूप निष्ठावान मानतो. तर मांजरीही याबाबतीत कमी नाहीत. तुम्ही पाहिलं असेल, की अनेकदा लोक कुत्रा आणि मांजर दोघांनाही एकत्र ठेवतात, त्यामुळेच त्यांच्यात मैत्रीही पाहायला मिळते. हे दोन्ही प्राणी एकमेकांचे ओळखीचे शत्रू मानले जात असले तरी माणसांमुळे त्यांच्यात मैत्रीही निर्माण झालीय. सोशल मीडियावर अनेकदा कुत्रे आणि मांजरींशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामुळे आपल्याला हसायला येतं. काही व्हिडिओ आश्चर्य वाटणारेही असतात. ते मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतोय, यामध्ये मांजर आणि कुत्र्याचा अनोखा खेळ दिसत आहे.

केवळ धावपळ

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मांजर खांबांवर धावत आहे, त्यानंतर ती एका पातळ शिडीसारख्या विटांवर चढते आणि वरच्या छिद्रातून घरात प्रवेश करते, तर दुसरी मांजर शेजारच्या छिद्रात असते. ती येते. पाण्यातून बाहेर पडते आणि पाण्याच्या टाकीत उडी मारते. तिने आत उडी मारताच एक कुत्रा बाहेर येतो आणि दरवाजातून आत पळतो. आत गेल्यावर दुसऱ्या ठिकाणाहून एक मांजर बाहेर येते.

ट्विटरवरून शेअर

कुत्री आणि मांजरांचा हा खेळ खूपवेळ चालतो. त्याचवेळी काही लोक पायऱ्यांवर आरामात बसून हे दृश्य पाहत आहेत. हा मजेदार व्हिडिओ @buitengebieden_ या आयडीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आलाय. ‘पाहणं थांबवू शकत नाही’ असं कॅप्शन याला लिहिलं आहे.

मजेशीर कमेंट्स

अवघ्या 1 मिनिटाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाख 87 हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आलंय. तर 21 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलंय. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की ‘हा माझा आतापर्यंतचा फेव्हरेट चेस सीन आहे’, तर दुसऱ्या यूझरने ‘ये लाजवाब है’ अशी कमेंट करत व्हिडिओचं कौतुक केलंय.

Viral : 100हून जास्त भुसुरूंग शोधण्यास मदत करणाऱ्या कंबोडियातल्या मगावा उंदराचा मृत्यू, वाचा सविस्तर

Video : अपघातानंतर पहिल्यांदाच समोर आला सहदेव दिरदो, ‘बचपन का प्यार’ फेम कलाकारानं काय म्हटलं, पाहा…

आनंद महिंद्रा यांनी अलिबागमधल्या सूर्यास्ताचा सुंदर फोटो केला ट्विट, नेटिझन्सनीही Share केले अप्रतिम Photos

Published On - 1:58 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI