मालकीणीचा पाय फ्रॅक्चर, कुत्र्याने रात्र मालकीणीच्या पायाजवळ काढली, निष्ठावान कशाला म्हणतात पाहा Video

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा आपल्या मालकिणीच्या मोडलेल्या पायाची काळजी घेताना दिसत आहे. जो त्याच्या मालकीला आईस पॅक लावण्याबरोबरच, त्याच्या वेदनादायक जागेवर चाटतानाही दिसतो

मालकीणीचा पाय फ्रॅक्चर, कुत्र्याने रात्र मालकीणीच्या पायाजवळ काढली, निष्ठावान कशाला म्हणतात पाहा Video
मालकीणीची काळजी घेणारा निष्ठावान कुत्रा

सर्वात निष्ठावान प्राणी कोण?असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही नक्कीच कुत्र्याचे नाव सांगाल. हे खरंच आहे. बरेच लोक त्यांच्या पाळीव कुत्र्याला त्यांच्या कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य मानतात. कुत्रा हा सर्वात प्रामाणिक आणि विश्वासार्ह प्राणी देखील मानला जातो. तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल की कुत्रा हा जगातील एकमेव असा प्राणी आहे जो स्वतःपेक्षा त्याच्या मालकाची जास्त काळजी घेतो. नुकताच यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही ही गोष्ट अगदी खरी मानाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा आपल्या मालकिणीच्या मोडलेल्या पायाची काळजी घेताना दिसत आहे. जो त्याच्या मालकीला आईस पॅक लावण्याबरोबरच, त्याच्या वेदनादायक जागेवर चाटतानाही दिसतो आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कुत्रा रात्रभर आपल्या मालकीणीच्या पायाजवळच बसून राहतो.

हा व्हिडिओ पाहा

View this post on Instagram

A post shared by Cuddle My Dog (@cuddlemydog)

या मनमोहक व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेक युजर्सने त्यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘जर तुम्हाला विचारले की, सर्वात निष्ठावान प्राणी कोण आहे, तर तुम्ही नक्कीच कुत्र्याचे नाव सांगाल आणि हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, कुत्र्याची निष्ठा पाहून मी माझा दिवस बनला आहे.’ हा व्हिडिओ इन्स्टाग्राम सोशल मीडिया साइटवर Cuddlemydog नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने “सर्वोत्तम काळजीवाहक कोणीही असू शकते” असे कॅप्शन लिहिले आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

तुमच्या माहितीसाठी की, याआधीही डॉगीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक कुत्रा मुलाला होमवर्क करण्यात मदत करताना दिसत आहे. यादरम्यान मुलही कुत्र्याशी प्रेमाने वागते आणि त्याचे लाड करताना दिसले.

हेही पाहा:

Video: कुसू कुसू गाण्यावर तरुणीचा भन्नाट बेली डान्स पाहून नेटकरी घायाळ, डान्स व्हिडीओ प्रचंड Viral

Video: अस्वल लाडात आलं, मालकामागे गाडी शिरण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर जे झालं, त्याचा चांगलाच भुर्दंड!

 

Published On - 12:03 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI