Viral Video : हत्तीच्या पिलाचे माणसासोबत नखरे, लोक म्हणतायत ‘नटखट है ये बालक’, व्हिडीओ पाहाच

प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ विशेष आवडीने पाहिले जातात. सध्या हत्तीच्या पिलाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (elephant baby viral video)

Viral Video : हत्तीच्या पिलाचे माणसासोबत नखरे, लोक म्हणतायत 'नटखट है ये बालक', व्हिडीओ पाहाच
ELEPHANT BABY

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यापैकी प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ विशेष आवडीने पाहिले जातात. प्राण्यांच्या वेगवेगळ्या करमातीमुळे ते व्हायरलसुद्धा होतात. वाघापासून ते वानरापर्यंतचे मजेदार व्हिडीओ पाहणे काही लोकांना खूप आवडते. याच कारणामुळे सोशल मीडियावर फक्त प्राणी आणि पक्षांचे व्हिडीओ अपलोड करणारे काही स्पेशल अकाऊंट आहेत. त्याच अकाऊंटवरचा एका हत्तीच्या पिलाचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Elephant baby playing with man viral video goes viral)

हत्तीला सर्वात मजेदार आणि बलशाली असलेला प्राणी म्हटलं जातं. हत्ती आणि माणसाच्या मैत्रीवर अनेक चित्रपटसुद्धा निघाले आहेत. हत्ती हा नटखट आणि खोडकर असतो असेसुद्धा अनेकवेळी म्हटलं जातं. सध्या याचीच प्रचिती या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

व्हिडीओमध्ये एक मोठी हत्ती उभा असलेला दिसतोय. त्याच्या बाजूला हत्तीचं पिल्लू आहे. हे हत्तीचं पिल्लू बाजूला बसलेल्या माणसासोबत अतिशय खोडकर पद्धतीने खेळत आहे. आपली सोंड माणसाकडे नेऊन हत्तीचे पिल्लू त्या माणसाची खोड काढत असल्यासारखे दिसत आहे. काहींनी तर हे पिल्लू त्या माणसाला माझ्यासोबत खेळायला चल असे सांगत असल्याचे म्हटलंय. हत्तीच्या पिलाचं हे अशा प्रकारे मुक्तपणे खेळणं पाहून अनेकजण वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ नंदीरॉक्स नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अपलोड करताच अनेकांनी त्याला भरभरुन लाईक केले आहे. व्हिडीओसोबत दिलेले कॅप्शनसुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

माणुसकीचा जिवंत झरा! तहानलेल्या माकडाला चक्क बॉटलनं पाजलं पाणी, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांवरील वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्यांचा अर्थ नेमका काय? वाचा सविस्तर

ढिंच्यॅक डान्स करणारा हा धडाडीचा आयपीएस अधिकारी ओळखलात का?

(Elephant baby playing with man viral video goes viral)

Published On - 4:11 pm, Sun, 18 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI