AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Photo : नाशकातल्या द्राक्षबागेत कवट्या महाकाळची एन्ट्री? फोटोमागचं नक्की कारण तरी काय?

हा फोटो पाहिल्यानंतर, ज्यांना शेतीतलं माहित नाही, त्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल, हे आहे तरी काय?

Viral Photo : नाशकातल्या द्राक्षबागेत कवट्या महाकाळची एन्ट्री? फोटोमागचं नक्की कारण तरी काय?
नाशिकमध्ये द्राक्ष बागांमधील शेतकऱ्याचा हा फोटो व्हायरल होत आहे
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 6:36 PM

नाशिक: इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. त्यातल्या त्यात शेती संबंधिचे  (Farmer Video) अनेक जुगाडही सोशल मीडियावर (Social Media) लगेच व्हायरल होत असतात. आता असाच एक फोटो चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. हा फोटो पाहून अनेकजण कोड्यात पडले आहे. हा फोटो आहे, भुताच्या चेहऱ्याचे मास्क घातलेल्या काही व्यक्तीचा, जे द्राक्षबागेत काहीतरी घेऊन जाताना दिसत आहेत.

हा फोटो पाहिल्यानंतर, ज्यांना शेतीतलं माहित नाही, त्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल, हे आहे तरी काय? हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना महेश कोठारेंच्या धडाकेबाज चित्रपटातल्या कवठे महाकाळची आठवण झाली. अगदी असेच मास्क घालून त्या चित्रपटात व्हिलनची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ही काय चित्रपटाची शुटींग आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मात्र मंडळी, थोडं थांबा. ही काय चित्रपटाची शुटींग नाही, तर द्राक्षबागेत होणारं एक महत्त्वाचं काम आहे. जे काम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी करावं लागतं. पण ते करत असताना, त्यांच्या जीवालाही मोठा धोका असतो. हाच धोका टाळण्यासाठी शेतकरी असा काहीतरी जुगाड करतात.

हे सुद्धा वाचा

पाहा फोटो:

द्राक्षबागेत दरवर्षी फळ छाटणी होते, म्हणजेच द्राक्ष उतरवली जातात. द्राक्ष उतरवल्यानंतर पुन्हा एकदा बागांचीही छाटणी केली जाते. द्राक्षबागा पुन्हा एकसारख्या बहरण्यासाठी फळ छाटणीनंतर त्यावर हायड्रोनजन सायनामाईटचा वापर केला जातो. त्यामुळे काड्यांची फूट एकसारखी निघते. हे केमिकल अत्यंत घातक आणि विषारी असतं. जे श्वासात गेलं तरी मृत्यू होण्याचा धोका असतो. हे केमिकल द्राक्षबागांमध्ये वापरताना संपूर्ण शरीर झाकण्याची, विशेषत: चेहरा झाकण्यासाठी विशेष ड्रेस वापरण्याचा सल्ला दिला जातो.

मात्र, दरवेळी इतका पैसा यावर खर्च करणंही शक्य नसतं, अशावेळी काही शेतकरी असा जुगाड करतात. ज्यात चेहरा कुठल्यातरी मास्कने पूर्णपणे झाकला जातो, अंगही झाकलं जातं. ज्यातून शेतकरी स्वत:ची काळजी घेत असतो. हाच जुगाड या द्राक्षबागेत वापरण्यात आला आहे. ज्याचा फोटो आता व्हायरल होत आहे. त्यामुळे मंडळी, शेतकऱ्यांच्या या कष्टाचं जेवढं कौतुक करावं, तेवढं कमीच आहे.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.