किती तो राग! वाद शिगेला, एअर होस्टेसवर हल्ला
या विमानात बसलेल्या एकाही प्रवाशाला विमानात एवढा गोंधळ होणार आहे याची कल्पना नव्हती.

आजकाल लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरही खूप राग येतो आणि त्याचा फटका दुसऱ्याला सहन करावा लागतो. या व्हिडिओमध्ये विमानात महिला प्रवासी आणि एअर होस्टेसमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हे विमान सॅन फ्रान्सिस्कोहून शिकागोला जात होते, असे सांगण्यात येत आहे. या विमानात बसलेल्या एकाही प्रवाशाला विमानात एवढा गोंधळ होणार आहे याची कल्पना नव्हती.
या व्हिडिओमध्ये एक महिला प्रवासी तिच्या मुलासोबत दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्ही पाहा…
Flight attendant assaulted on @united flight 476 that just landed in Chicago at @fly2ohare. pic.twitter.com/4ksmKl5PAC
— Peter Kondelis (@PeterKondelis) November 13, 2022
या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला पकडून उभी असलेली एक महिला फ्लाइट अटेंडंटवर ओरडताना दिसत आहे.
या महिला प्रवासीला वारंवार मागे हटण्यास सांगितले जात असताना सुद्धा हा वाद इतका शिगेला गेला की या महिलेने एअर होस्टेसवर हल्लाच केला. या वादानंतर एअर होस्टेसला रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
महिला आणि फ्लाइट अटेंडंटमध्ये वाद कशामुळे झाला, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या गोंधळामागील कारण अद्याप उघड झालेले नाही.
या व्हिडीओमध्ये पुढे पाहता येईल की इतर क्रू मेंबर्सही फ्लाइट अटेंडंटच्या मदतीसाठी पुढे येतात. या प्रकरणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय यावरून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. एफबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
