Video: 15 प्रश्नांची बरोबर उत्तरं द्या, मोफत रिक्षाचा प्रवास करा, बंगालमध्ये रिक्षा चालकाची अनोखी स्किम

हा ई-रिक्षावाला लोकांना सामान्य ज्ञानाशी संबंधित 15 प्रश्न विचारतो, त्याची उत्तरे बरोबर दिली तर त्यांच्याकडून रिक्षाचं भाडं घेत नाही. हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे.

Video: 15 प्रश्नांची बरोबर उत्तरं द्या, मोफत रिक्षाचा प्रवास करा, बंगालमध्ये रिक्षा चालकाची अनोखी स्किम
15 प्रश्नांची उत्तरं दिली तर मोफत रिक्षा प्रवास देणारा रिक्षाचालक


सोशल मीडियाच्या जगात सध्या ई-रिक्षाची चर्चा जोरात सुरू आहे. हा ई-रिक्षावाला लोकांना सामान्य ज्ञानाशी संबंधित 15 प्रश्न विचारतो, त्याची उत्तरे बरोबर दिली तर त्यांच्याकडून रिक्षाचं भाडं घेत नाही. हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे. हा रिक्षावाला पश्चिम बंगालमधील हावड्याचा रहिवासी आहे. आता या व्यक्तीची कहाणी फेसबुकवर व्हायरल होत आहे. हे समजल्यानंतर लोकही या व्यक्तीचे चाहते झाले आहेत.

संकलन सरकार नावाच्या फेसबुक युजरने हावडा जिल्ह्यातील लिलुहा गावचा रहिवासी असलेल्या सुरंजन कर्माकर यांची कथा त्यांच्या अकाऊंटवर शेअर केली आहे, जी पोस्ट होताच व्हायरल झाली. संकलनाच्या पोस्टनुसार, सुरंजन त्यांना विचारलेल्या 15 सामान्य ज्ञान प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या लोकांना मोफत प्रवास देतो.

फेसबुक पोस्टमध्ये, संकलन लिहितो की तो एक अतिशय मनोरंजक व्यक्ती भेटला. तो ई-रिक्षातून रंगोली मॉलच्या दिशेने जात होता. दरम्यान, रिक्षावाला म्हणजेच सुरंजनने त्याला सांगितले की, जर त्यांनी त्याच्या 15 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर तो त्यांच्याकडून भाडं घेणार नाही. हे ऐकून संकलनच्या पत्नीला आश्चर्य वाटले. दोघेही एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. संकलनाने पुढे लिहिले, ‘प्रथम मला वाटले की जर मी त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही, तर तो माझे भाडे दुप्पट करेल.’

संकलनची फेसबुक पोस्ट:

यानंतर संचालनाने रिक्षावाल्याला सांगितले की, मी तुम्हाला भाडे देणारच आहे तरी तुम्ही प्रश्न विचारू शकता. पहिला प्रश्न होता – जन गण मन हे राष्ट्रगाण कुणी लिहलं आहे? यानंतर रिक्षावाल्याने विचारले – पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यावर संकलकने चुकीचे उत्तर दिले. यानंतर रिक्षावाला प्रश्न विचारत राहिला. यावेळी त्यांनी श्रीदेवीच्या जन्म तारखेपासून पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीबद्दल विचारले. दोन-तीन प्रश्न सोडले तर संकलनाची इतर सर्व उत्तरे बरोबर निघाली.

रिक्षावाला सुरंजनचा व्हायरल व्हिडीओ:

दरम्यान, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सहावीनंतरचे शिक्षण सोडावे लागल्याचे चालक सुरजन याने संकलनाला सांगितले. पण तो रोज दुपारी 2 वाजेपर्यंत जनरल नॉलेज वाचत राहतो. त्यांनी सांगितले की ते लालिया बुक फेअर फाऊंडेशनचा सदस्य आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की सुरंजन हा बंगालमध्ये अद्भूत ऑटोवाला नावानेही प्रसिद्ध आहेत.

हेही पाहा:

Video: कुत्र्याने अशी विकेटकिपिंग केली की, क्रिकेटचा देवही प्रसन्न झाला, पाहा सचिनने शेअर केलेला अप्रतीम व्हिडीओ!

Video: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं कुत्र्याचं भूत, ऑस्ट्रेलियातील व्यक्तीच्या दावात किती सत्य, तुम्हीच पाहा!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI