Video: कुत्र्याने अशी विकेटकिपिंग केली की, क्रिकेटचा देवही प्रसन्न झाला, पाहा सचिनने शेअर केलेला अप्रतीम व्हिडीओ!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुसऱ्या टोकाकडून चेंडू टाकताच कुत्रा लगेच सक्रिय होतो आणि विकेटकीपरच्या भूमिकेत येतो. त्यानंतर जे काही घडते ते खरोखरच थक्क करणारे आहे.

Video: कुत्र्याने अशी विकेटकिपिंग केली की, क्रिकेटचा देवही प्रसन्न झाला, पाहा सचिनने शेअर केलेला अप्रतीम व्हिडीओ!
विकेट किपिंग करणारा कुत्रा
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 4:41 PM

‘क्रिकेटचा देव’ म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कुत्रा लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा ज्या पद्धतीने चेंडू पकडताना दिसत आहे ते पाहून सचिनही हैराण झाला आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्याने त्याच्या चाहत्यांना विचारले आहे, तुम्ही याला काय नाव द्याल? या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ साडेसात लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर चाहतेही यावर सातत्याने प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना सचिन तेंडुलकरने कॅप्शनमध्ये लिहिले की, मला हा व्हिडीओ एका मित्राने फॉरवर्ड केला. हे पाहिल्यानंतर, मला असे म्हणायचे आहे की, हे जोरात पडणारे बॉल पकडण्याचं कौशल्य आहे. आपण क्रिकेटमध्ये अप्रतिम यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक आणि अष्टपैलू खेळाडू पाहिले आहेत. पण तुम्हाला काय नाव द्यायला आवडेल? चला तर मग पाहूया हा मजेदार व्हिडिओ.

व्हिडिओमध्ये दोन मुले घराजवळील रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहेत. मुलांनी स्टंप म्हणून लाकडाचा वापर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुसऱ्या टोकाकडून चेंडू टाकताच कुत्रा लगेच सक्रिय होतो आणि विकेटकीपरच्या भूमिकेत येतो. त्यानंतर जे काही घडते ते खरोखरच थक्क करणारे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्रा अप्रतिम विकेट कीपिंग करताना बॉल तोंडाने पकडतो. यानंतर, पुढच्या चेंडूवर शॉट पडल्यावर तो क्षेत्ररक्षणासाठी धावतो.

1 मिनिट 17 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत 62 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. तर त्याला 8 हजाराहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘कॅमेरा क्वालिटी बरोबर नाही, पण खरोखरच अप्रतिम व्हिडिओ आहे.’ त्याचवेळी आणखी एका यूजरने म्हटले की, आजच्या काळात टीम इंडियाला अशा ऑलराऊंडरची गरज आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला लगान चित्रपटाची आठवण झाली.’ एकूणच हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

हेही पाहा:

Video: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं कुत्र्याचं भूत, ऑस्ट्रेलियातील व्यक्तीच्या दावात किती सत्य, तुम्हीच पाहा!

Video: तिरुपतीच्या पुरात फसलेल्या पुजाऱ्याला ट्रॅफिक पोलिसाने वाचवलं, शूरवीर पोलिसाचं नेटकऱ्यांकडून कौतुक

 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.