…नाहीतर तोंडावरच आपटला असता, Treadmill म्हणून कशाचा वापर केला या पठ्ठ्यानं? पाहा Viral video

Funny exercise video : व्यायामाला (Exercise) कोणताही शॉर्टकट (Shortcut) नाही. व्यायाम करण्यासाठी जीममध्येच गेले पाहिजे असे नाही, घरीही करू शकता. तिथे तुम्हाला घाम गाळावा लागतो. आता एक विनोदी (Comedy) व्हिडिओ व्हायरल (Viral) झालाय.

...नाहीतर तोंडावरच आपटला असता, Treadmill म्हणून कशाचा वापर केला या पठ्ठ्यानं? पाहा Viral video
ट्रेडमीलऐवजी वॉशिंग लिक्विड वापरत ही व्यक्ती करतेय व्यायाम
Image Credit source: Youtube
प्रदीप गरड

|

Mar 23, 2022 | 7:30 AM

Funny exercise video : आजकाल सर्वांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी असते. पण या धावपळीच्या काळात वेळ मिळत नसल्याने व्यायाम करता येत नाही. मग काही लोकांचे पोट पुढे येते. हे लोक चिंताग्रस्त असतात, की आपले पोट कसे कमी करायचे? कोणी जीममध्ये जाते, तर कोणी घरीच व्यायाम करते. व्यायाम हा शरीरासाठी आवश्यक असून त्याशिवाय आपण आजारांना दूर ठेवू शकत नाहीत. व्यायामाला (Exercise) कोणताही शॉर्टकट (Shortcut) नाही. तिथे तुम्हाला घाम गाळावा लागतो. तासन् तास शारीरिक श्रम केल्याशिवाय तुमच्या ध्येयापर्यंत म्हणजे कोणाला रोगांपासून दूर राहायचे असेल, कोणाला चांगली शरीरयष्टी हवी असेल, कोणाला पोट कमी करायचे असेल किंवा मग कोणाला फीट राहायचे असेल तर व्यायाम गरजेचाच आहे. पण व्यायाम करण्यासाठी जीममध्येच गेले पाहिजे असे नाही, घरीही करू शकता. आता एक विनोदी (Comedy) व्हिडिओ व्हायरल (Viral) झालाय.

घरच्या घरीच व्यायाम

व्हिडिओमध्ये आपल्याला एक व्यक्ती दिसेल. त्याचे पोट पुढे आलेले आहे. त्याला व्यायाम करायचा आहे. पण जीममध्ये जाण्याची इच्छा नाही. मग घरी व्यायाम कसा करायचा, तर तो शक्कल लढवतो. त्याच्या घरी जमिनीवरील ज्या टाइल्स वापरल्या आहेत, त्या गुळगुळीत आहेत. याचाच फायदा तो घेतो. तो घरातील वॉशिंग करण्यासाठी वापरले जाणारे लिक्विड घेतो. त्यातले काही जमिनीवर टाकतो आणि त्यावरून वॉकिंग करतो. अर्थात त्याच्यासमोर सपोर्टसाठी व्यवस्था आहे, नाहीतर तोंडावर आपटला असता.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ हरप्रीत एसडीसी (Harpreet SDC) या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. 20 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 1.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ‘Bach Gya‘ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. हा मजेदार व्हिडिओ असून लोक पसंत करत आहेत.

आणखी वाचा :

काय, आठवले ना लहानपणीचे दिवस? कसा बिनधास्तपणे डुलक्या घेतोय? Viral video पाहून खूप हसाल

Viral photo : ‘या’ फोटोत तुम्हाला गाढव दिसतंय का? मग डोक्याला अजून ताण देण्याची गरज; JK Rowlingही confused

‘हे’ तर रिअल लाइफमधले tom & jerry! मांजरीला पाहून उंदीर काठीच्या टोकावर..! Funny video viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें