Video: चाकूला कच्चू म्हणणारी क्युट चिमुरडी, आईसमोर चिमुरडीचे बोबडे बोल, नेटकरी चिमुकलीवर फिदा!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आई तिच्यासमोर ठेवलेला चाकू दाखवते आणि मुलीला विचारते की, ते काय आहे? ती चिमुरडी त्या चाकूला कचू म्हणते. हा चिमुरडीचा हा व्हिडीओ सर्वांना आकर्षित करणारा आहे

Video: चाकूला कच्चू म्हणणारी क्युट चिमुरडी, आईसमोर चिमुरडीचे बोबडे बोल, नेटकरी चिमुकलीवर फिदा!
आईसमोर चिमुरडीचे बोबडे बोल

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथं मजेदारपासून ते धोकादायक असे अनेक व्हिडिओ पाहिले जातात. हे व्हिडीओ असे आहेत की, ते प्रत्येकाच्या मनात घर करून राहतात. अनेकदा इंटरनेटवर लहान मुलांशी संबंधित व्हिडिओ बघायला मिळतात, हे व्हिडिओ येताच व्हायरल होतात. त्याच्या गोंडसपणा सगळ्यांनाच मोहित करतो. आम्हा सर्वांना लहान मुलं आवडतात आणि जेव्हा ते बोलतात, तेव्हा आम्ही त्यांचे शब्द खूप प्रेमाने आणि मजेने ऐकतो. विशेषतः जेव्हा मुले बोबडी बोलतात. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगी तिच्या आईशी बोबडं बोलत आहे. त्याचा हा व्हिडीओ सर्वांनाच खूप आवडला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आई तिच्यासमोर ठेवलेला चाकू दाखवते आणि मुलीला विचारते की, ते काय आहे? ती चिमुरडी त्या चाकूला कचू म्हणते. हा चिमुरडीचा हा व्हिडीओ सर्वांना आकर्षित करणारा आहे आणि लोकांना हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहायला आवडतो. व्हिडीओमध्ये आईसमोर एक गोंडस मुलगी दिसत होती, जी प्लेटमध्ये काही काकडी कापत होती. असे करत असताना मुलीच्या आईने चाकूकडे बोट दाखवून याला काय म्हणतात? असं विचारले. तर ती “चाकू” म्हणण्याचा प्रयत्न करत असलेल्या मुलीला “कचू” म्हणताना पाहून तिच्या आईला हसू आवरता आले नाही.

व्हिडीओ पाहा:

हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. मी एंड माइन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आईने कसे काम करायचं तुम्हीच सांगा? जेव्हा ही लहान मुलगी आईला खूप हसवते. ‘ हा व्हिडिओ आतापर्यंत लाखोवेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की लोक त्यावर कमेंट करत आहेत आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने म्हटले की, “मेरा दिन बनाया! मला मुलीचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायला आवडतात!” दुसर्‍याने लिहले की, “ती खूप गोंडस आहे.” तिसर्‍या यूजरने लिहिले, ‘मला माझे जुने दिवस आठवतात, हा व्हिडिओ खूप गोंडस आहे आणि मुलगीही तितकीच सुंदर आहे’ या व्हिडिओवर दुसऱ्याने लिहिले – मला वाटते की लहानपणापासून मुलांना चांगले बोलायला शिकवले पाहिजे. अन्यथा काही मुलं खोटे बोलतात. लोक या व्हिडिओवर इमोजी देखील शेअर करत आहेत.

हेही पाहा:

Video: कॅब चालकासोबत प्रँक करणं तीन ब्लॉगरला चांगलंच महागात, तब्बल झाली एवढ्या वर्षांची शिक्षा!

Video: माकडाने आजोबांना केली अशी मदत, लोक पाहून म्हणाले, ‘माणसा परीस माकडं बरी!’

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI