Viral Video : जिममध्ये घुसून चोरी करणं पडलं महागात, अशी शिक्षा मिळाली की चोराने धंदाच बदलला..
सध्या एका चोराचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याला जिममध्ये चोरी केल्याबद्दल मोठी किंमत मोजावी लागली. ही चोरी उघडकीला आल्यावर त्याला अशी शिक्षा मिळाली ज्याची त्याने कधीही कल्पना केली नव्हती. असं काय घडलं तिथे ?

सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला असे व्हिडीओ बघायाला मिळतात जे पाहून आपल्याला हसू आवरत नाही. तर काही वेळा ते पाहून असं का असा प्रश्न आपल्याला पडतो. कधीकधी, मजेदार व्हिडिओ देखील खूप वेगाने व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. त्या व्हिडीओतून दिसतं की, एका चोराने जिममधून चोरी करण्याची चूक केली. यानंतर, तिथल्या लोकांनी त्याच्यासोबत जे काही केलं ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल. आणि तो चोर तर पक्का त्याचा धंदाच बदलून टाकेल आता.
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की चोरांना फक्त काही चोरण्याची संधी हवी असते, ते गुपचूप त्यांचं काम करतात आणि संधी पाहून फरार होतात. पण प्रत्येक वेळी ते त्यांच्या चोरीत यशस्वी होतीलच असे नाही. बऱ्याचदा हे लोक पकडलेही जातात. आता समोर आलेला हा व्हिडीओच पहा ना, तिथे एक चोर जिममध्ये चोरी करताना पकडला गेला. त्यानंतर त्याची हालत अशी झाली, ज्याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल. शेवटी तो व्हिडीओ पाहून यूजर्सना त्या चोराचीच दया आली असेल.
इथे पहा व्हिडीओ
Thief Forced to Exercise After Being Caught in Cox’s Bazar Gym pic.twitter.com/iaPhNJmRcC
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 12, 2025
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक चोर जिममधून चोरी करताना पकडला गेला. पण तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केली नाही, पण त्याला वर्कआऊटची शिक्षा दिली. सर्वप्रथम, त्यांनी त्याला पुश-अप करायला लावलं. तर नंतर त्याला तिथल्या वस्तूंवरून जड वजन उचलायला लावले जाते. एवढंच नव्हे तर त्यानंतर त्याला स्क्वॉट्स आणि प्लँक्ससारखे थकवणारे व्यायाम करायला लावले. या दरम्यान, चोर वारंवार पडत राहिला आणि अडखळत होता, परंतु त्याची हालत खराब होईपर्यंत प्रशिक्षकाने त्याला सोडले नाही.
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
हा व्हिडिओ X वर @gharkekalesh नावाच्या अकाउंट यूझरने शेअर केला आहे. तो पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या लोकांनी या चोराचा फिटनेस चांगला करून दिला, असं एकाने लिहीलं. तर दुसऱ्याने लिहिले की भाऊ, खरे सांगायचे तर आता मला त्या या चोराची दया येते. तर तिसऱ्याने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, अशी शिक्षा मिळाल्यावर आता हा चोर त्याचा धंदाच बदलून टाकेल ना.
