Video: प्रशिक्षकालाच माकडाचा जोरदार रपाटा, व्हिडीओ पाहून नेटकरी हसून लोटपोट

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मालक हातात खोटी लाकडाची तलवार धरून उभं आहे आणि त्याच्या जवळ एक माकड बसले आहे, जो माकडाचा हात धरून त्याला तीन ते चार वेळा डोक्यावर तलवार मारण्याचा सराव सांगतो

Video: प्रशिक्षकालाच माकडाचा जोरदार रपाटा, व्हिडीओ पाहून नेटकरी हसून लोटपोट
माकडाने प्रशिक्षकावर राग काढला

प्राण्यांना बऱ्याचदा माणसांचं मनोरंजन करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणात त्यांना त्रासही दिला जातो, जेणेकरुन ते मालकाच्या आदेशाचं पालन करतील. मात्र जेव्हा प्रेक्षकांसमोर कलाकारी दाखवण्याची वेळ येते, तेव्हा कधी कधी हे प्राणी चिडतात. आपला राग ते थेट मालकावरच दाखवतात. असाच काहिसा प्रसंग सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये घडला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू फुटल्याशिवाय राहणार नाही. ( Funny viral video of monkey who hit his by stick during training)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मालक हातात खोटी लाकडाची तलवार धरून उभं आहे आणि त्याच्या जवळ एक माकड बसले आहे, जो माकडाचा हात धरून त्याला तीन ते चार वेळा डोक्यावर तलवार मारण्याचा सराव सांगतो, माकडंही ते पाहतं, आणि जेव्हा मालक हात सोडतो, तेव्हा माकड मालकाच्याच डोक्यावर जोरदार वार करतो. जे पाहून लोक हसतात. नशीब ही तलवार खेळण्यातील होती, खरी असती तर या मालकाचं काही खरं नव्हतं.

पाहा व्हिडीओ:

हा मजेदार व्हिडिओ eRexChapman ने शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले – मी तुम्हाला सांगतो, मी हसणे थांबवू शकत नाही. ही बातमी लिहीपर्यंत या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक व्ह्यूज, 21 हजारांहून अधिक लाइक्स आणि सुमारे 3500 रीट्वीट मिळाले आहेत. यासह, लोक या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हा मजेदार व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘असे दिसते की माकडाने आपला सर्व राग एका क्षणात काढला.’ या व्यतिरिक्त, इतर अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

हेही पाहा:

Video: गर्भवती महिला ट्रेनरवर अस्वलाचा हल्ला, जमिनीवर पाडून नखांचे ओरखडे, हादरवून सोडणारा व्हिडीओ

Video: गळात किंग कोब्रा घेऊन सर्पमित्राचे स्टंट, लोक म्हणाले, बाबा जपून, सापाचा काही भरवसा नसतो!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI