AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाद करायचा नाय, गौतमीच्या या गाण्यावरील शेवटची स्टेप भल्या भल्यांना जमत नाही, स्टेप पाहून तुम्ही…..

सबसे कातील गौतमी पाटीलचा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाण्यावर डान्स, शेवटची स्टेप भल्या भल्या डान्सरला जमणार नाही. अनेकांनी केलं तिच्या या डान्सचं कौतुक.

नाद करायचा नाय, गौतमीच्या या गाण्यावरील शेवटची स्टेप भल्या भल्यांना जमत नाही, स्टेप पाहून तुम्ही.....
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 17, 2026 | 4:24 PM
Share

Gautami Patil : गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना आपल्या जबरदस्त डान्सने घायाळ करणारी नृत्यांगना म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील. काही दिवसांआधी गौतमी पाटील ही महानगरपालिकांच्या प्रचारमध्ये व्यस्त होती. मात्र, सध्या तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या हटके स्टेप्स पाहून अनेकजण चकित झाले आहेत. भल्या भल्या डान्सरला जमणार नाही अशा गौतमी पाटीलच्या स्टेप आहेत. त्यासोबतच तिने ज्या गाण्यावर डान्स केला आहे ते गाणं देखील लाखो चाहत्यांचं आवडतं आहे.

दरम्यान, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते तिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी तिच्या या डान्सचं कौतुक देखील केलं आहे. त्यासोबतच तिने या डान्सच्या वेळी निवडलेली साडी देखील खूपच चर्चेत आली आहे. तिची ही जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर तिने केलेल्या हटके स्टेप चाहत्यांना आकर्षित करत आहेत. या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत असून तिचा हा लूक देखील चर्चेत आला आहे.

या गाण्यावरील तिचा डान्स तिच्या प्रत्येक स्टेपमध्ये असणारा आत्मविश्वास, लय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो आहे. विशेष म्हणजे या गाण्यावरील तिच्या स्टेप्स इतक्या अवघड आणि वेगळ्या आहेत की, अनेकांना त्या सहजपणे जमणे शक्य नाही असे चाहत्यांकडून बोलले जात आहे. गौतमीच्या नृत्याची खासियत म्हणजे तिची एनर्जी, चेहऱ्यावरचे भाव आणि ठसकेबाज हालचाली. ‘चाँदी की डाल पर सोने का मोर’ या गाण्यावर तिने दिलेले एक्सप्रेशन्स आणि तिच्या हटके स्टेप्स पाहून प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले आहेत.

नेटकऱ्यांकडून कौतुक

या डान्सवर अनेक चाहते रील्स बनवत आहेत. मात्र गौतमीसारखी अचूकता आणि ग्रेस साधणे अनेकांसाठी कठीण ठरत आहे. त्यामुळेच तिच्या नृत्यकलेचे कौतुक होत असून, गौतमीची स्टाईल वेगळी आणि जबरदस्त आहे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत.

लोकनृत्य, लावणी आणि आधुनिक डान्स यांचा सुरेख संगम साधणारी गौतमी पाटील आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकप्रिय होत आहे. तिचा हा नवा डान्स व्हिडीओही तिच्या लोकप्रियतेत आणखी भर घालणारा ठरत असून आगामी काळात ती आणखी कोणत्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.