AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहीही हां..! खाद्यपदार्थांवरचे विचित्र प्रयोग थांबता थांबेना, आता पाणीपुरीचा ‘हा’ Viral video पाहा

Weird food combination : एकाने पाणीपुरी शेकचा (Panipuri shake) शोध लावला आहे. हे पाहून लोक उलट्या होत असल्याचे म्हणत आहेत. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) एक विक्रेता गोलगप्पा शेक म्हणजेच पाणीपुरीचा शेक बनवताना दिसत आहे.

काहीही हां..! खाद्यपदार्थांवरचे विचित्र प्रयोग थांबता थांबेना, आता पाणीपुरीचा 'हा' Viral video पाहा
विक्रेत्यानं तयार केलेला पाणीपुरी शेक
| Updated on: Feb 25, 2022 | 11:56 AM
Share

Weird food combination : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विचित्र फूड कॉम्बिनेशनशी संबंधित व्हिडिओंचा पूर आला आहे. रस्त्यावरील विक्रेते एखाद्या चांगल्या खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करत आहेत जणू काही देशात लज्जतदार पाककृती तयार करण्याची स्पर्धा सुरू आहे. कधी वडा पाव आईस्क्रीम रोलचा व्हिडिओ, तर कधी मॅगीसोबत पाणीपुरी… यामुळे लोकांचे डोके चक्रावले आहे. याच प्रकारामध्ये सध्या व्हायरल होत असलेला पाणीपुरीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हादरून गेला आहे. एका माणसाने पाणीपुरी शेकचा (Panipuri shake) शोध लावला आहे. हे पाहून लोक उलट्या होत असल्याचे म्हणत आहेत. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता, की एक विक्रेता गोलगप्पा शेक म्हणजेच पाणीपुरीचा शेक बनवताना दिसत आहे. ही व्यक्ती आधी मिक्सरच्या भांड्यात काही पाणीपुरी टाकते. यानंतर, त्यात उकडलेले बटाटे, आंबट आणि गोड पाणी घालून त्याचा शेक तयार करते. यानंतर ते ग्लासमध्ये ओतून त्यावर पाणीपुरी पावडरने सजवते आणि सर्व्ह करते.

इन्स्टाग्रामवर शेअर

ही अजब रेसिपी पाहून तुम्हालाही क्षणभर काय करावे, ते कळणार नाही. या विचित्र पाणीपुरी शेकचा व्हिडिओ Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर foodie_blest नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की ‘क्या लगता है, कैसा होगा?’ 9 फेब्रुवारीला शेअर केलेला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत 7 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून सर्वजण विक्रेत्याला झापत आहेत.

विक्रेत्यावर काढत आहेत राग

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विक्रेत्यावर आपला राग काढत आहेत. एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की उलटी होण्यासाठी पिशवी द्याल नाहीतर आम्हाला सोबत आणावी लागेल. त्याचवेळी दुसरा यूझर म्हणतो, की हे पाहिल्यानंतर मला उलट्या झाल्या. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की विक्रेते काहीही करत आहेत, अशाना हाकलून द्या.

View this post on Instagram

A post shared by Aiyushi (@foodie_blest)

आणखी वाचा :

लेकीला निरोप देताना झाला भावुक! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बाप-लेकीचा Emotional video viral

#Himveers : ITBPच्या ज्युलीचा आपल्या गोंडस पिल्लांसोबतचा ‘हा’ Photo आणि Video होतोय Viral! तुम्ही पाहिला का?

Viral : सहाव्या वर्षी पहिला भव्य वाडा, सुपर कार्स आणि बरंच काही; कोण आहे ‘हा’ सर्वात तरूण अब्जाधीश?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.