AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ‘या’ 5 ठिकाणी भारतीयांनाच नो एंट्री! फक्त परदेशींना मिळतो प्रवेश, कारण ऐकून व्हाल थक्क

Unique Places in India : भारतात फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. मात्र, देशातच अशी काही ठिकाणे आहेत जिथे भारतीयांना प्रवेश नाकारला जातो किंवा परदेशी पर्यटकांना विशेष प्राधान्य दिले जाते. जाणून घेऊया अशीच ५ ठिकाणे आणि त्यामागचे कारण.

भारतातील ‘या’ 5 ठिकाणी भारतीयांनाच नो एंट्री! फक्त परदेशींना मिळतो प्रवेश, कारण ऐकून व्हाल थक्क
Unique Places in India Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Oct 06, 2026 | 4:08 PM
Share

भारत हा विविधतेने नटलेला देश असून देशातील बहुतांश पर्यटनस्थळांवर भारतीयांना मुक्तपणे फिरता येते. मात्र, भारतातच अशी काही ठिकाणे आहेत, जिथे भारतीय नागरिकांना प्रवेश किंवा सेवा देण्यास नकार दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी परदेशी पर्यटकांसाठी स्वतंत्र धोरण असल्याचे सांगितले जाते, तर काही ठिकाणी स्थानिक वाद आणि सुरक्षेशी संबंधित कारणे दिली गेली आहेत. अशीच पाच ठिकाणे आणि त्यांच्याशी संबंधित कारणे जाणून घेऊया.

फ्री कसोल कॅफे, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील कसोल हे देश-विदेशातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाण आहे. मात्र, येथील ‘फ्री कसोल कॅफे’बाबत भारतीयांना प्रवेश नाकारल्याचा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, एका भारतीय महिलेला मेन्यू देण्यास कथितरित्या नकार देण्यात आला, तर तिच्यासोबत असलेल्या परदेशी व्यक्तीला सेवा देण्यात आली. यानंतर कॅफेच्या परदेशी पर्यटकांना प्राधान्य देणाऱ्या धोरणावर वाद निर्माण झाला.

साकुरा रयोकान, अहमदाबाद

अहमदाबादमधील साकुरा रयोकान हे जपानी शैलीचे कॅफे असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी भारतीयांना प्रवेश नाकारल्याच्या कारणावरूनही वाद झाला होता. रिपोर्टनुसार, परदेशी किंवा जपानी ग्राहकांसाठी विशेष वातावरण निर्माण करण्याचा दावा करण्यात आला होता. महिला कर्मचाऱ्यांकडे पाहणे किंवा गैरवर्तनाच्या कथित तक्रारींचाही या धोरणाशी संबंध जोडण्यात आला होता.

फॉरेनर्स-ओन्ली बीच, गोवा

गोवा आपल्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, काही बीचवर केवळ परदेशी पर्यटकांना प्रवेश दिला जात असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. परदेशी महिला पर्यटकांशी छेडछाडीच्या कथित घटनांमुळे काही ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आल्याचे कारण सांगितले जाते. या प्रकारामुळे भारतीय पर्यटकांना प्रवेश नाकारण्यावरून यापूर्वी वादही निर्माण झाले आहेत.

रेड लॉलीपॉप इन, चेन्नई

रेड लॉलीपॉप इन हे हॉटेल भारतीयांना प्रवेश न देण्याच्या धोरणामुळे चर्चेत आले होते. रिपोर्टनुसार, हे ठिकाण विशेषतः पहिल्यांदा भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी असल्याचे सांगितले गेले होते. त्यामुळे भारतीय पाहुण्यांच्या प्रवेशाबाबत वेगळी धोरणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ब्रॉडलँड्स हॉटेल, चेन्नई

चेन्नईमधील ब्रॉडलँड्स हॉटेलही अशाच कारणामुळे चर्चेत आले होते. जुन्या रिपोर्ट्सनुसार, परदेशी पासपोर्ट असलेल्या पर्यटकांना येथे राहण्याची सुविधा दिली जात असल्याचे सांगण्यात आले होते, तर भारतीय पाहुण्यांना खोली नाकारल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र, हॉटेलने भारतीयांना प्रवेश न देण्याच्या धोरणाचा दावा नाकारला होता आणि परदेशी पर्यटकांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट केले होते.

महत्त्वाचे

या ठिकाणांबाबतचे प्रवेशाचे नियम, धोरणे किंवा परिस्थिती बदललेली असू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी संबंधित ठिकाणाशी संपर्क साधून सध्याचे नियम तपासणे योग्य ठरेल.

Follow Us
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!