AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुहेत शिरताच तरुणी पोहोचली दुसऱ्या जगात, लाखो लोकांनी पाहिला Video; तुम्ही?

बर्मिंघमच्या "अंडरग्राऊंड बर्मिंघम" नावाच्या इन्स्टाग्राम ग्रुपने एका आश्चर्यकारक गुहेचा शोध लावला आहे. या गुहेत एका कुटुंबाचे संपूर्ण घर होते, ज्यात फ्रिज, झोपण्याची जागा आणि पाणीपुरवठाही होता. हा शोध सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गुहेचा शोध इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो मानवी संस्कृतीवर नवा प्रकाश टाकतो.

गुहेत शिरताच तरुणी पोहोचली दुसऱ्या जगात, लाखो लोकांनी पाहिला Video; तुम्ही?
Birmingham's Astonishing Caves Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 06, 2025 | 1:48 PM
Share

पृथ्वीवर अजूनही अत्यंत रोमांचक ठिकाणं आहेत. जगाला माहीत नसलेल्या या जागा स्वर्गाहूनही अप्रतिम आहेत. अचानक अशा जागांचा शोध लागतो. त्यातील दृश्य पाहून आपण भारावून जातो. ही अज्ञात ठिकाणं लोकांसमोर आणणं हे एक चॅलेंज आहे. तसं ते अद्भूत कामही आहे. अशा जागांमधून इतिहास कळतो. पुरातन काळातील अनेक गोष्टी उजागर होतात. मानव संस्कृतीवर नवा प्रकाश पडतो. नवं संशोधन समोर येतं. अनेक युगाांपूर्वी या ठिकाणी राहत असलेल्या लोकांची माहिती समोर येते.

सोशल मीडियावर असे असंख्या इन्व्हेस्टिगेशन ग्रुप्स आहेत. हे लोक अशा जगाला शोधून जगासमोर आणत असतात. इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये राहणाऱ्या काही मित्रांनी ‘अंडरग्राऊंड बर्मिंघम’ नावाने इ्न्स्टाग्रामवर असंच एक अकाऊंट बनवून ठेवलं आहे. हे लोक अनेक शतकांपूर्वीच्या गुंफा शोधतात. बंकरमद्ये जातात. तिथली दुनिया पाहतात. त्याचं ऐतिहासिक महत्त्व पडताळून पाहतात आणि जगाला त्याची माहिती देतात.

दृश्य असं की…

बर्मिंघमच्या या ग्रुपने नुकतीच एक गुहा शोधली होती. या गुहेच्या आतील दृश्य मन मोहून टाकणारं होतं. आश्चर्यकारक होतं. या गुहेत पूर्वी कुटुंब राहत होतं याचं आश्चर्य वाटू लागतं. कारण या गुहेत सर्व सुख सुविधांच्या वस्तू होत्या. अख्खा संसार या गुहेत होता. त्यामुळे या गुहेचीही स्वत:ची म्हणून एक कहाणी समोर आली.

तरुणी आत शिरली

या ग्रुपमधील तरुण तरुणी जसजसे गुहेत शिरले तस तसे त्यांना आतील जग वेगळेच दिसू लागले. त्यामुळे त्यांना अधिकच आश्चर्य वाटू लागलं. गुहेत शिड्या होत्या आणि सुरुंगही होते. ते पाहून ही तरुणी अधिक आश्चर्यचकीत झाली. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. गुहेत फ्रिज दिसतंय. त्यात काही तरी ठेवलेलं दिसतंय. त्याच्याच बाजूला झोपण्याचीही जागा आहे. त्याशिवाय पाण्याची पाईपलाईनही गुहेत दिसतेय.

लाखो लोकांनी पाहिला

एवढ्या अरुंद आणि पाण्याने भरलेल्या गुहेत दुसरं जगही असू शकतं याची आम्हाला कल्पनाच करवत नाही, असं या तरुणीने म्हटलं. @undergroundbirmingham या इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर करून या ग्रुपने एक पोस्ट लिहिली आहे. आम्ही या गुहेत एका परिपूर्ण घराचा शोध लावला आहे, असं या पोस्टमंध्ये म्हटलं आहे. या पोस्टला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. तसेच या पोस्टला लाखो व्ह्यूजही मिळाले आहेत. हजारो लोकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजर्सने तर काय भारी घर आहे राव, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या यूजर्सने तर ओ साहेब, गुहेत तीन फ्लोर कसे? असा सवाल केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.