Viral Video: घराबाहेर सायकल चालवणाऱ्या मुलावर रस्त्यावरील कुत्र्याचा भयानक हल्ला, 14 सेकंद चावत राहिला..

कुत्र्यांचे हल्ले कधी थांबणार?

Viral Video: घराबाहेर सायकल चालवणाऱ्या मुलावर रस्त्यावरील कुत्र्याचा भयानक हल्ला, 14 सेकंद चावत राहिला..
भटक्या कुत्र्याचा हल्ला Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 3:47 PM

कोझिकोड- रस्त्यावरील कुत्र्यांच्या उद्रेकाचा आणखी एक व्हिडीो समोर आला आहे. आपल्या घराबाहेर सायकल चालवणाऱ्या एका मुलावर रस्त्यावरच्या कुत्र्याने भयानक हल्ला केल्याचा प्रकार व्हिडीओत कैद झालेला आहे. या मुलाचे वय १२ वर्षे असल्याचे सांगण्यात येते आहे. या हल्ल्यात हा १२ वर्षांचा मुलगा चांगलाच जखमी झालेला आहे.

घटना केरळ राज्यातील कोझोकड जिल्ह्यातील आहे. आरनिक्कार गावात गोविंद विलासम शाळेजवळ हा प्रकार घडला आहे. ११ सप्टेंबर म्हणजे रविवारी दुपारी एक मुलगा आपल्या घराजवळ सायकल चालवत होता. तो आपल्या मित्रांसाठी एका घराबाहेर थांबला तेवढ्यात समोरुन कुत्रा आला आणि त्याने या मुलाच्या अंगावर हल्ला केला.

हे सुद्धा वाचा

छातीवर उडी, हातापायांना चावला

कुत्र्याने थेट या मुलाच्या छातीवर आधी उडी घेतली. त्यानंतर कुत्र्याने या मुलाच्या पायाचा चावा घेतला. मुलाने त्याला झटकण्याचा प्रयत्न केला तर कुत्रा त्याच्या हाताला चावला. त्याचा हात त्याने बराच काळ दातांत धरला होता. या मुलाने घरात शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्रा त्याचा हात सोडण्यास तयार नव्हता. थोडा जोर लावून मुलगा घरात शिरला आणि त्यानंतर तो कुत्रा पळून गेला. त्यानंतर परिसरातील कोलं या मुलाला पाहायला धावत आले.

या कुत्र्याने आणखी चार जणांचा घेतला चावा

कोझिकोडमध्ये रविवारीच या कुत्र्याने आणखी चार जणांवर हल्ला केल्याची माहिती आहे. या कुत्र्याला पाकडण्यात आले की नाही याची काहीही माहिती नाही. गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ आणि घटना समोर आलेल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी जवळच्याच गावात दोन मुलांसह पाच जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. स्थानिकांनी अनेकदा परिसरातील या भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी केल्या आहेत. शनिवारी उत्तर प्रदेशात एका गार्डनमध्ये फिरणाऱ्या मुलावर पिटबुल कुत्र्याने हल्ला केला होता. त्यात त्याच्या चेहऱ्याला १५० टके पडल्याची घटना घडलेली आहे.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.