AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लाइटमध्ये मनपसंद सीट पाहिजे? मग या ट्रीक्स नक्की वापरा

भारतामध्ये दररोज सुमारे ६ लाख प्रवासी फ्लाइटने प्रवास करतात. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणारे लोक वेळेची बचत आणि आरामासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, अनेक वेळा आपल्या आवडती सीट मिळत नाही आणि त्यामुळे संपूर्ण प्रवासाचा आनंद कमी होतो. अशा वेळी जर बुकिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुम्हाला तुमची मनपसंत सीट सहज मिळू शकते.

फ्लाइटमध्ये मनपसंद सीट पाहिजे? मग या ट्रीक्स नक्की वापरा
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jun 25, 2025 | 4:46 PM
Share

भारतात दररोज लाखो प्रवासी विमानाने प्रवास करतात. विशेषतः जे प्रवासी लांबच्या अंतरावर जातात, ते रेल्वे किंवा बसपेक्षा विमानप्रवासालाच प्राधान्य देतात. मात्र विमानप्रवास अधिक आरामदायक व्हावा यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे “आपल्या आवडती सीट” मिळणे. विंडो सीटवर बसून आकाशातून खालचा नजारा पाहायची मजा काही औरच! पण नेमकी हीच सीट आपल्याला मिळेल कशी?

बुकिंगवेळीच करा सीट सिलेक्शन

जेव्हा तुम्ही विमानाचं तिकीट बुक करता, तेव्हा अनेक एअरलाईन्स ‘सीट सिलेक्शन’चा पर्याय देतात. मात्र बऱ्याच प्रवासी हा पर्याय दुर्लक्षित करतात. ते केवळ वेळ आणि भाडं पाहून तिकीट बुक करतात. त्यामुळे शेवटी सिस्टीमद्वारे कोणतीही सीट त्यांना आपोआप अलॉट होते. म्हणूनच, जेव्हा सीट निवडण्याचा पर्याय असेल, तेव्हा तो नक्की वापरा.

विंडो सीट हवीय? मग हे करा

जर तुम्हाला खास विंडो सीटवर बसायचं असेल, तर तिकीट बुक करतानाच ती निवडा. एकदा बुकिंग झाल्यानंतर नंतर बदल करणे कठीण होऊ शकते. अनेकदा विंडो, एक्सिट रो किंवा फ्रंट रो अशा प्रीमियम सीट्ससाठी थोडं जास्त शुल्क लागतो. पण या सीट्स अधिक आरामदायक आणि स्पेसयुक्त असतात, विशेषतः लांबच्या फ्लाइट्ससाठी.

लेग स्पेस पाहिजे? मग हे करा

फ्लाइटमधील प्रवास अधिक आरामदायक हवा असेल, तर लेग स्पेसला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. विशेषतः लांब प्रवासात पाय मोकळे ठेवण्याची गरज अधिक जाणवते. यासाठी ‘एक्सिट रो’ किंवा ‘फ्रंट रो’ सीट्स हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. या सीट्समध्ये सामान्य सीट्सपेक्षा अधिक जागा असते, ज्यामुळे पाय मोकळेपणाने ठेवता येतात आणि थकवा कमी होतो. मात्र अशा सीट्ससाठी अनेक वेळा अतिरिक्त शुल्क आकारले जाते, तरीही त्या आरामदायक प्रवासासाठी मूल्यवान ठरतात. त्यामुळे जर तुम्हाला लेग स्पेस हवी असेल, तर बुकिंग करताना या सीट्स निवडणं नक्कीच फायदेशीर ठरेल.

वेब चेक-इनचा फायदा घ्या

फ्लाइटच्या प्रस्थानापूर्वी २४ ते ४८ तास आधी वेब चेक-इन सुरु होतं. यावेळी अनेक सीट्स उपलब्ध असतात आणि तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या पसंतीची सीट निवडू शकता. त्यामुळे वेब चेक-इनला अजिबात उशीर करू नका. जेव्हा ही विंडो उघडेल, तेव्हा लगेच लॉग इन करून सीट बुक करा.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.