AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unique Revenge ! दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा.. धोकेबाज पती आणि बेस्टफ्रेंड असा शिकवला धडा, सगळ्या शहरात..

एका महिलेने तिच्या फसव्या पतीचा आणि जिवलग मैत्रीणीचा ज्या प्रकारे बदला घेतला, ते पाहून संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. हे प्रकरण आता सोशल मीडियाच्या 'जगात' वाऱ्याच्या वेगाने पसरलं.

Unique Revenge ! दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा.. धोकेबाज पती आणि बेस्टफ्रेंड असा शिकवला धडा, सगळ्या शहरात..
| Updated on: Sep 02, 2025 | 11:24 AM
Share

प्रेमात धोका मिळाला तर माणसांच मनच तुटून जातं. त्या वेदनेतून सावरणं, पुन्हा उभं राहण हे खूपच कठीण जातं. पण चीनच्या हुनान प्रांतातील एका महिलेने तिच्या फसव्या पतीचा आणि जिवलग मैत्रीणीचा ज्या प्रकारे बदला घेतला, ते पाहून संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. हे प्रकरण आता सोशल मीडियाच्या ‘जगात’ वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. असं काय केलं तिने ?

चीनमधील चांगशा येथील एका महिलेला नुकतंच कळलं की तिच्या पतीचे गेल्या 5 वर्षांपासून कोणाशी तरी विवाहबाह्य प्रेमसंबंध आहेत. पण तिला सर्वात जास्त धक्का बसला, जेव्हा तिला कळली की ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून तिची सर्वात जवळची मैत्रीण आहे. या फसवणुकीमुळे ती महिला प्रचंड दु:खी झाली, कोसळली, पण नशीबाला दोष देण्यापेक्षा आणि अश्रू ढाळत बसण्यापेक्षा तिने असं काही केलं ज्याची कोणी कल्पनाच केली नसेल. बदला घेण्यासाठी महिलेने जो मार्ग अवलंबला तो पाहून सगळेच हैराण झाले.

काय केलं महिलेने ?

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, त्या महिलेने संपूर्ण शहरात लाल रंगाचे बॅनर लावले होते, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते – 5 वर्षे मला साथ देणाऱ्या माझ्या पतीचे आभार. हा तिच्या विश्वासघातकी जिवलग मैत्रिणीवर थेट टोमणा होता, जिने तिच्या पाठीत वार केला होता.

एवढंच नाही तर त्या महिलेने आणखी एक बॅनर लावला ज्यामध्ये तिने थेट तिच्या मैत्रिणीचे नाव घेतले आणि लिहिले, “तिने नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिचे तिच्या जिवलग मैत्रिणीच्या पतीशी अवैध संबंध होते?” हा बॅनर समोर येताच संपूर्ण शहरात खलबळ माजली. कोणीतरी या बॅनरचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले , शेअर केले आणि बघता बघता ते फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले आणि लोकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली.

या घटनेने एक नवीन वाद निर्माण झाला आहे. काही लोकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केलं, तर अनेकजण तिचं वागणं चुकीचं असल्याचं म्हणत होते. तर महिलेचे हे कृत्य तिच्या मैत्रिणीच्या गोपनीयतेवर आणि प्रतिष्ठेवर हल्ला आहे, ज्यामुळे तिला कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागू शकते असा दावा वकिलांनी केला आहे.

एकवेल पतीने दिलेला धोका मी विसरू शकते पण सर्वात मोठा त्रास तर मला माझ्या मैत्रिणीने दिलेल्या धोक्यामुळे झाला असं त्या महिलेचं म्हणणं आहे. त्याचाच तिने बदला घेतला.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.