पती-पत्नींनी केली DNA टेस्ट,अहवालात दोघे निघाले मायलेक, सत्य जाणून बसला धक्का
जीवनात कोणती स्थिती कधी निर्माण होईल हे सांगू शकत नाही. जीवन हेच एक कोडे आहे , अनेकदा हे जीवन अशा वळणावर आपल्याला नेते की त्यावेळी कोणता निर्णय घ्यावा हेच कळत नाही.

अनेकदा जीवनात अशी वळणं येतात ज्यात नाती बदलून जातात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जी आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करेल. एका महिलेने कधी विचार केला नसेल की आपल्या जीवनात असा प्रसंग कधी येईल.एका महिलेने ज्याच्याशी संसार थाटून इतकी वर्षे घालवली त्याच्या डीएनए टेस्टमध्ये तो नवरा तिचा चक्क लेक निघाला असे कसे काय घडले याचा चर्चा सुरु आहे.
या महिलेचे जीवन संघर्षाचे होते. आर्थिक तंगीमुळे या महिलेने आपल्या नवजात मुलाला दत्तक देऊन टाकले. जन्म झालेल्या मुलाचे भविष्य अंधकारमय कर तिने त्याला दत्तक देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिला हा निर्णय एके दिवशी अशा वळणावर घेऊन येईल. मुलाला दत्तक दिल्यानंतर तिने त्याच्याशी कोणताच संपर्क ठेवला नाही. आणि मायलेक दोघेही एकमेकांपासून दूर झाले.
नंतर अनेक दशकांनंतर मुलगा तरुण झाला होता. आणि जावनात एक वेगळे वळण आहे. आणि ही महिला आणि तिचा मुलगा एकमेकांना भेटले. तेव्हा त्यांना एकमेकांच्या नात्याबद्दल काहीही कल्पना नव्हती. दोघांमध्ये प्रेम झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर या दोघांना दोन मुलेही झाली. त्यांच्या जीवनात या मुलांनी आनंद आणला. परंतू या आनंदावर लवकरच विरजण पडणार आहे हे त्यांना माहिती नव्हते.
जेव्हा या मुलांच्या भविष्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेताना त्यांनी डीएनए टेस्ट केली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. रिपोर्ट आला तेव्हा कळले की हा ज्याच्या संसार थाटला आहे तो तिच्या पोटी जन्म घेतलेला मुलगाच आहे. त्याला तिने ३६ वर्षांपूर्वी जन्म दिला होता. हा धक्का इतका मोठा होता की त्यांचे जीवनच बदलले. त्यांच्या संसाराचे भविष्यच धोक्यात आले.
महिलेने सांगितले की जेव्हा २०१५ मध्ये ती तिच्या पतीला भेटली तेव्हा तो केवळ २१ वर्षांचा होता. आणि साल २०१६ आणि २०१७ मध्ये त्यांना दोन मुलेही झाली. परंतू तिने स्वत:च्या मुलाला ओळखले कसे नाही ? असा प्रश्न तिला विचारला तेव्हा ती म्हणाली की मी खूपच कमी वयात आई झाले होते. आणि परिस्थिती इतकी वाईट होती की मुलाचा चेहराही पाहू शकली नाही. ती म्हणाली मला जीवनात कधी असा दिवस येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आपल्याच मुलाला पतीच्या रुपात पाहणे मला जड जात आहे.हे रहस्य उघड झाल्यानंतर तिच्यावर काय परिस्थिती आली याची कल्पना करवत नाही. ही महिला आणि तिचा पती आता वेगळे होऊन या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या मुलांचे भविष्य आता अधांतरी झाले आहे. आता या निष्पापांचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
