भारतातील सर्व मुसलमानांना हिंदू म्हणणारे IAS नियाज खान यांचा ब्राह्मणांबाबत मोठा दावा, ‘ब्राह्मण यहुदीप्रमाणे…’
IAS Niaz Khan: आयएएस अधिकारी नियाज खान छत्तीसगडचे रहिवाशी आहे. ते 2015 बॅचचे अधिकारी आहेत. आयएएस नियाज खान राज्य सेवेत अधिकारी होते. त्यानंतर त्यांना प्रमोट करण्यात आले. त्यांनी आतापर्यंत सात कांदबऱ्या लिहिल्या आहेत.

IAS Niaz Khan: मध्य प्रदेश कॅडरचे आएएस अधिकारी नियाज खान नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते नेहमी सक्रीय असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. त्यांनी ‘ब्राह्मण द ग्रेट’, आणि ‘वॉर ऑफ कलियुग’ यासारखी पुस्तके लिहिली आहे. त्यांनी त्यांचे पुस्तक ‘ब्राह्मण द ग्रेट’ पुस्तकाच्या संदर्भ घेत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांचे हे वक्तव्य चांगलेच व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया एक्सवर आएएस अधिकारी नियाज खान यांनी ब्राह्मणांबाबत एक पोस्ट केली आहे. ते म्हणतात, मी जेव्हा ब्राह्मणांचे नाव घेतो तेव्हा लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येतात. परंतु ब्राह्मणांना वेगळे केले तर देशाचे मोठे नुकसान होणार आहे.
ब्राह्मण आध्यात्मिक गुरु
BRAHMIN THE GREAT पुस्तकाचा आधार घेत सोशल मीडियावर ब्राह्मणांचे कौतूक करत त्यांनी एक पोस्ट केली आहे. मी ब्राह्मणांचे नाव घेतल्यावर लोक संतप्त होतात. ते यहुदी म्हणजेच ज्यू लोकांप्रमाणे सुपर जीनियस आहे. माझे पुस्तक ‘ब्राह्मण द ग्रेट’ मध्ये मी हेच लिहिले आहे. एकटा ब्राह्मण अनेक हजार लोकांच्या बरोबर आहे. इतिहास बदलण्यासाठी ब्राह्मणांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांना वेगळे केले तर देशाचे मोठी हानी होईल. ब्राह्मण आध्यात्मिक गुरु आहेत, असे नियाज खान म्हणतात.




आयएएस नियाज खान यांनी यापूर्वी हिंदू-मुस्लिमांबाबत आपले विचार मांडले आहेत. त्यांनी मुस्लिमांना हिंदूंना आपले भाऊ मानण्याचे आवाहन केले आहे. 2015 च्या बॅचचे अधिकारी नियाज खान यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणतात की, धर्म भिन्न असू शकतात, परंतु प्रत्येकाचे रक्त सारखे आहे. प्रत्येकजण एकाच संस्कृतीचा भाग आहे. जे मुस्लीम अरब लोकांना आदर्श मानतात, त्यांनी पुन्हा विचार करावा. सर्वांनी हिंदूंना आपले बांधव मानले पाहिजे, असे आवाहन त्यांनी मुस्लिमांना केले आहे. त्यांनी कश्मीर फाइल्स आणि हिजाब वादावरही मत व्यक्त केले आहे. तसेच भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना हिंदू सांगत ते चर्चेत आले होते.
कोण आहे नियाज खान
आयएएस अधिकारी नियाज खान छत्तीसगडचे रहिवाशी आहे. ते 2015 बॅचचे अधिकारी आहेत. आयएएस नियाज खान राज्य सेवेत अधिकारी होते. त्यानंतर त्यांना प्रमोट करण्यात आले. त्यांनी आतापर्यंत सात कांदबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या एका कादंबरीवर वेब सीरीज तयार झाली आहे.