झोपेत चावला साप, अचानक पोटात दुखू लागलं.. दुसऱ्यादिवशी महिलेने दिला बाळाला जन्म, नेमकं काय घडलं?
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला पलंगावर झोपली असता तिला साप चावला. तिला दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले. त्यानंतर त्या महिलने बाळा जन्म दिला आहे.

देशभरात अनेक ठिकाणी सापांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. काही ठिकाणी साप चावल्यामुळे जीव गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. आता एका महिलेला झोपेत साप चावला आहे. त्यानंतर तिच्या अचानक पोटात दुखू लागले. तिला दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात. तिची प्रकृती इतकी नाजूक झाली होती की तिला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. महिला अक्षरश: मृत्यूशी झुंज देत होती. दुसऱ्या दिवशी महिलेने बाळाला जन्म दिला आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं.
नेमकं काय घडलं?
मध्य प्रदेशमधील सतना जिल्हात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेला झोपेतच साप चावला होता. ही महिला 8 महिन्यांची गर्भवती होती. साप चावल्यामुळे तिच्या पोटात दुखू लागले आणि ती बेशुद्ध झाली. तिला दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला बेशुद्ध झाली होती. तिची प्रकृती इतकी खालावली होती कि तिला डॉक्टरांनी वेंटिलेटरवर ठेवले होते. पण डॉक्टरांनी त्या महिलेला आणि बाळाला दोघांनाही वाचवले. दुसऱ्या दिवशी वेंटिलेटवर असतानाच त्या महिलेने एका बाळाला जन्म दिला. हा जाणून काही एक चमात्कारच होता.
वाचा: चंद्र ग्रहणामुळे कोणत्या राशींचा होणार फायदा? कोणत्या राशींवर येणार संकट?
झोपेत सर्प दंश
जिल्हा मुख्यालयालगतच्या रेउरा फार्म येथे राहणाऱ्या लकी डोहर (वय 24) यांना 3 सप्टेंबरच्या रात्री झोपेत असताना विषारी सापाने दंश केला. रात्रीच्या वेळेमुळे कुटुंबीयांना याची भनकही लागली नाही. सापाच्या दंशानंतर काही क्षणातच ती बेशुद्ध होऊन जीवन-मृत्यूशी लढत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या पतीने, नागेंद्र डोहरने, कसेबसे तिला जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल केले.
डॉक्टरांसमोर दुहेरी आव्हान
डॉक्टरांच्या मते, लकीला रुग्णालयात आणेपर्यंत तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. तिचे SPO2 50% पेक्षा कमी झाले होते, नाडी आणि रक्तदाब यांचा काहीच पत्ता नव्हता. अशा परिस्थितीत मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक आणि तज्ज्ञ डॉ. बद्री विशाल सिंह यांनी तातडीने तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. याचवेळी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एलपी सिंह यांच्याशी सतत सल्लामसलत केली गेली. पण खरे आव्हान हे होते की, लकीच्या गर्भात आठ महिन्यांचे बाळ वाढत होते. एकीकडे आईचा जीव वाचवणे गरजेचे होते, तर दुसरीकडे गर्भातील बाळाला सुरक्षितपणे बाहेर काढणेही आवश्यक होते.
डॉक्टरांनी व्हेंटिलेटवर असतानाच महिलेची प्रसूती केली. लकीने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने हा चमत्कार असल्याचे सांगितले. मुलीच्या जन्मानंतर देखील लकी दोन दिवस बेशुद्ध होती. ती शुक्रवारी शुद्धीवर आली. डॉक्टरांनी सांगितले की बाळ आणि मुलगी आता दोघेही सुरक्षित आहेत.
