AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपाळ आहे की लोखंड, मार्शल आर्टीस्ट तरुणाने आपल्या माथ्याने एका मिनिटात फोडले इतके अक्रोड, बनविला विश्वविक्रम

अक्रोड तोडणे तसेही अवघड असते. चांगली माहीतगार असलेली व्यक्ती दाताने किंवा हाताने अक्रोड तोडू शकते. परंतू कपाळाने हात न लावता अक्रोड तोडणे तसे अवघडच आहे.

कपाळ आहे की लोखंड, मार्शल आर्टीस्ट तरुणाने आपल्या माथ्याने एका मिनिटात फोडले इतके अक्रोड, बनविला विश्वविक्रम
WALNUT CRACKER NAVIN KUMARImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 07, 2023 | 8:45 PM
Share

नवी दिल्ली | 7 ऑगस्ट 2023 : अनेक जण आपलं नाव जगात प्रसिद्ध होण्यासाठी अनेक अजब-गजब विक्रम करीत असतात. कोणी डोक्याने नारळ फोडतात. कोणी हाताने किंवा लाथेने विटा फोडतात. आता एका मार्शल आर्ट् शिकलेल्या तरुणाने एका मिनिटांत सर्वाधिक अक्रोड फोडण्याचा पराक्रम केला आहे. त्याने राशिद मोहम्मद या पाकिस्तानी तरुणाचा माथ्याने सर्वाधिक अक्रोड तोडण्याचा साल 2018 चा रेकॉर्ड तोडला आहे.  तर पाहुयात कोण आहे हा अजब विक्रम करणारा तरुण…

विश्वविक्रम कोणताही असो त्यास प्राप्त करणे अवघड जबाबदारी असते. काही जण जागतिक विक्रम करण्यासाठी कोणतेही दिव्य करण्यासाठी तयार असतात. याच मालिकेत आता 27 वर्षीय नवीन कुमार यांनी एका मिनिटात आपल्या माथ्याने एका मिनिटांत चक्क 273 अक्रोड फोडण्याचा विक्रम केला आहे. नवीन कुमार याने हात न लावता कपाळाच्या सहाय्याने अत्यंत टणक कवच असलेले अक्रोड फोडून दाखवले आहेत.

अक्रोड तोडणे तसेही अवघड असते. चांगली माहीतगार असलेली व्यक्ती दाताने किंवा हाताने अक्रोड तोडू शकते. परंतू कपाळाने हात न लावता अक्रोड तोडणे तसे अवघडच आहे. नवीन याने एका सेंकदात सरासरी 4.5 अक्रोड फोडले. अशा प्रकारे एका सेंकदात एकूण 273 अक्रोड त्याने फोडल्याने त्याला नटक्रॅकर म्हटले जात आहे. नवीन याने सिरीयल रेकॉर्ड ब्रेकर पाकिस्तानच्या मोहम्मद राशिद याचा मागचा रेकॉर्ड तोडला आहे. राशिद याने साल 2018 मध्ये 254 अक्रोड तोडले होते.

हा पाहा नवीन कुमारचा रेकॉर्ड –

अक्रोड तोडण्यासाठी अहमिका

राशिद याने साल 2014 मध्ये प्रथम 150 अक्रोड तोडले होते. त्यानंतर साल 2016 मध्ये त्याने 181 अक्रोड तोडून स्वत:चाच रेकॉर्ड तोडला. त्यानंतर साल 2017 मध्ये नवीन याने प्रथमच या मालिकेत भाग घेत 217 अक्रोड तोडण्याचा विक्रम केला. त्याच्या एक वर्षानंतर नवीन आणि राशिद यांची समोरासमोर अक्रोड तोडण्याची स्पर्धा लागली. तेव्हा राशिद याने 254 अक्रोड तोडून विजय मिळविला.

पाच वर्षांनी विश्वविक्रम 

राशिद याच्या विक्रमानंतर पाच वर्षांनी नवीन याने नवा विक्रम प्रस्थापित करुन मेहनतीने चांगला नटक्रॅकर बनण्याचा विक्रम केला आहे. त्याच्या या पराक्रमामुळे तो खूप आनंदी आहे. त्याने गिनिज रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना सांगितले की स्वत:मधील कला सिद्ध करण्यासाठी आपण नवा विक्रम केला आहे. नवीन याने सुरुवातीपासून प्रभाकर रेड्डी यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले आहे. रेड्डी यांना देखील अनेक मार्शल आर्ट येतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.