AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | अंतराळातून पृथ्वी नेमकी कशी दिसते?, हा अद्भुत व्हिडीओ एकदा पाहाच

आर्थ डेच्या निमित्ताने आंततराष्ट्रीय स्पेस स्टेशनने 22 एप्रिल रोजी एक खास व्हिडीओ प्रदर्शित केलाय. (iss earth video earth day)

Video | अंतराळातून पृथ्वी नेमकी कशी दिसते?, हा अद्भुत व्हिडीओ एकदा पाहाच
EARTH PHOTO
| Updated on: Apr 25, 2021 | 6:14 PM
Share

मुंबई : अंतराळ, चंद्र, पृथ्वी यांच्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. अंतराळातून पृथ्वी नेमकी कशी दिसते हे तर प्रत्येकालाच जाणून घ्यायचं असतं. लोकांच्या याच उत्सुकतेपोटी आणि आर्थ डे (Earth day) च्या निमित्ताने आंततराष्ट्रीय स्पेस स्टेशनने (ISS) 22 एप्रिल रोजी एक खास व्हिडीओ प्रदर्शित केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आंततराष्ट्रीय स्पेस स्टेशनने हा व्हिडीओ आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. (International Space Station ISS released special video of earth on occasion of Earth Day )

ISS ने केला व्हिडीओ शेअर

ISS ने 22 एप्रिल रोजी अर्थ डेच्या (Earth Day)निमित्ताने अंतराळातून  पृथ्वीचा घेतलेला व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ आतापर्यंत 50 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ शेअर करताना ISS ने खास कॅप्शन लिहले आहे. “आरामात बसा आणि आनंद घ्या. आजच्या अर्थ डेच्या निमित्ताने ISS मधून घेतलेला पृथ्वीचा एक व्हिडीओ दाखवत आहेत. आम्ही जास्त काही सांगणार नाही. मात्र, तुम्ही या व्हिडीओचा आनंद घ्या,” असं ISS ने व्हिडीओसोबतच्या कॅप्शनध्ये लिहलं आहे. हा व्हिडीओ बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

हा व्हिडीओ एका मिनिटापेक्षाही कमी कालावधीचा आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन दिसत आहे. तसेच व्हिडीओ 4 K म्हणजेच हाय डेफिनेशनचा असल्यामुळे अंतराळातून पृथ्वीचं रुप अगदीचं स्पष्टपणे दिसत आहे. यामध्ये पृथ्वीवरील पांढरे ढग दिसतायत. तसेच, पंढरा आणि निळ्या स्परुपाच्या रंगाच्या छटा पृथ्वीभोवती दिसत आहेत. अंतराळातून पृथ्वी कशी दिसते याची उत्सुकता असणाऱ्यांसाठी हा व्हिडीओ एक पर्वणीच ठरला आहे. हा व्हिडीओ अतिशय स्पष्ट स्वरुपात असल्यामुळे पृथ्वीचं बाह्यरुप अतिशय छान दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून अनेक कमेंट्स

दरम्यान हा व्हिडीओ अलपोड केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी अगदीच सुंदर व्हिडीओ असल्याचं म्हटलंय. तर अनेकांनी माता पृथ्वी म्हणत हा व्हिडीओ आवडीने पाहिला आहे.

इतर बातम्या :

‘सोनम गुप्ता बेवफा’नंतर आता ‘पुष्पाच्या प्रेमपत्रा’ची चर्चा, म्हणते “दीपूजी मला पळवून न्या”.

VIDEO | चार वेळा बघण्याचा कार्यक्रम, साखरपुडाही झाला, नवरा म्हणतो नवरीच्या डोळ्यात दोष, वधूपक्षाने धू-धू धुतला

VIDEO | बाहेर जाऊ नकोस, कोरोना होईल, आजीचा पदर धरत चिमुकलीची आर्त हाक

(International Space Station ISS released special video of earth on occasion of Earth Day )

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...