‘सोनम गुप्ता बेवफा’नंतर आता ‘पुष्पाच्या प्रेमपत्रा’ची चर्चा, म्हणते “दीपूजी मला पळवून न्या”

पुष्पाचा 20 रुपयांच्या नोटीवरचा तिच्या प्रियकरासाठीचा संदेश सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. (sonam gupta pushpa 20 rupee note)

'सोनम गुप्ता बेवफा'नंतर आता 'पुष्पाच्या प्रेमपत्रा'ची चर्चा, म्हणते दीपूजी मला पळवून न्या
PUSHPA NOTE
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 4:22 PM

मुंबई : एक काळ होता जेव्हा प्रेमी युगुल आपले प्रेमसंदेश पोहचवण्यासाठी चिठ्ठीचा हमखास वापर करायचे. 90 च्या दशकात कित्येकांचे प्रेम या चिठ्ठ्यांमुळेच फुलले असावे. सध्या मात्र काळानुसार प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम आणि पद्धतसुद्धा बदलेली आहे. अनेकजण आपलं प्रेम तसेच आपला प्रेमभंग व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवतायत. सध्या 20 रुपयांच्या नोटेवरचा आपल्या प्रियकरासाठीचा संदेश पाठवणारी पुष्पा चर्चेचा विषय ठरली आहे. (after Sonam Gupta bewafa hai Pushpa 20 rupee note goes viral on social media)

सोनम गुप्तानंतर आता पुष्पाची नोट

तुम्हाला आठवत असेल, मागे काही दिवसांपूर्वी ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असा मजकूर असलेली दहा रुपयांची नोट चांगलीच व्हायरल झाली होती. चक्क नोटेवर लिहलेला एका प्रेमवेड्याचा हा संदेश काही क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचला होता. त्याचा झालेला प्रेमभंग पाहून अनेकांनी दु:खसुद्धा व्यक्त केलं होतं. या प्रेमवेड्याला त्याची सोनम पुन्हा मिळावी अशी इच्छासुद्धा अनेकांनी व्यक्त केली होती. तर काहींनी ‘सोनम गुप्ता बेवफा है’ या मेसेजला पाहून मिश्कील भाष्यसुद्धा केलं होतं. आता असाच एक प्रेमसंदेश चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी आता बेवफाई नाही तर चक्क प्रेम निभावण्याचे आवाहन करणारी एक 20 रुपयांची नोट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“दीपूजी मला घेऊन जा”

या वीस रुपयांच्या नोटेवर लिहलेला मजकूर स्पष्टपणे दिसतो आहे. पुष्पा नावाच्या मुलीने आपला प्रियकर दीपू याच्यासाठी हा मजकूर लिहला आसावा. 20 रुपयांच्या नोटेवर पुष्पाने तिचं लग्न 26 एप्रिलला असल्याचं सांगितलं आहे. तसेच, ती दीपूला दीपूजी म्हणत मला लवकरात लवकर येथून घेऊन जा असं सांगतेय. “प्रिय दीपूजी ! माझं लग्न 26 एप्रिलला आहे. मला तुमच्या सोबत पळवून घेऊन जा. तुमचीच पुष्पा आय लव्ह यू,” असं पुष्पाने एका नोटीवर आपला प्रियकर दीपूजीसाठी संदेश लिहला आहे.

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

दरम्यान, पुष्पाने लिहलेला हा संदेश खरा आहे की खोटा याबद्दल अजूनतरी निश्चित काही समजू शकले नाही. मात्र, हा संदेश खरा असल्याचे ग्राह्य धरत अनेकांनी या नोटीवरच्या संदेशाला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे. सोनम गुप्ताच्या बेवफाईनंतर आता पुष्पाचे प्रेम नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

इतर बातम्या :

VIDEO : सेक्स एज्युकेशन विषयी माहिती सांगणारा मिल्कशेकचा व्हिडीओ, अनेकांकडून आक्षेप, मोठा गदारोळ, अखेर ऑस्ट्रेलिया सरकार नमलं

Video | नारंगी साडीतील शालूचा काळ्या रानात जलवा; चाहते म्हणतायत ‘हळू चाल काटा रुतेल गं…’

Birthday Special : रोमँटीक गाणी गाणाऱ्या अरिजीत सिंहचा घटस्फोट, आता एका मुलीच्या आईसोबत थाटला संसार

(after Sonam Gupta bewafa hai Pushpa 20 rupee note goes viral on social media)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.