Video | हवाई कसरतीदरम्यान अचानक बिघाड, विमान समुद्राकडे वळलं, पुढं जे झालं ते एकदा बघाच

एका वैमानिकाने विमानामध्ये बिघाड झाल्यामुळे विमानाचे थेट समुद्रात लँडिंग केले आहे. (viral video airplane emergency landing)

Video | हवाई कसरतीदरम्यान अचानक बिघाड, विमान समुद्राकडे वळलं, पुढं जे झालं ते एकदा बघाच
AIRPLANE EMERGENCY LANDING
prajwal dhage

|

Apr 20, 2021 | 7:42 PM

मुंबई : सोशल मीडियावर आपण अनेक प्रकारचे व्हिडीओ बघतो. यामध्ये काही व्हिडीओ हे प्राणी, पक्षी तर काही व्डिडीओ हे आश्चर्यात पाडणारे असतात. व्हिडीओंमधील अनेक करामती पाहून आपण थक्क होतो. पण यापेक्षाही विविध दुर्घटनेचे हादरवून टाकणारे व्हिडीओसुद्धा आपल्यासमोर येतात. सध्या असाच एक दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका वैमानिकाने अचानक बिघाड झाल्यामुळे विमानाचे थेट समुद्रात लँडिंग केले आहे. (viral video of airplane emergency landing on beach people get shocked)

विमानात बिघाड झाल्यामुळे थेट पाण्यात

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. वर्ल्ड वॉर 2 (World War II) मध्ये मोठी कामगिरी बजावलेले एक विमान थेट पाण्यात उतरवण्यात आले आहे. जेव्हा लोक बिचवर आनंद लुटत होते; अगदी त्याच वेळी हे विमान समुद्रात उतरवण्यात आले. यावेळी बिचवर अंघोळ करणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

नेमकं काय झालं ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विमान उतरवण्याचा थरार दिसतोय. हा प्रकार कोका बिच येथे घडला. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे कोका बिचवर काही लोक आनंद लुटत होते. कोणी अंघोळ करत होते. याच वेळी अचानक वर्ल्ड वॉर 2 (World War II) मध्ये वापरलं गेलेलं एक विमान आकाशात उडत होतं. मात्र या विमानात अचानकपणे बघाड झाली. त्यानंतर पायलटने हे विमान थेट कोका बिचकडे वळवले. यावेळी बिचवर पाण्यात आनंद लुटत असलेल्या काही लोकांना हे विमान दिसले. त्यानंतर विमान आपल्याकडेच येत असल्याचे समजल्यानंतर लोकांनी पाण्याच्या बहेर धाव घेतली. हे विमान बिचकडे येऊन पुन्हा हवेत धाव घेईल असे प्रत्येकालाच वाटले होते. मात्र, विमानावरील ताबा सुटल्यामुळे वैमानिकाला आपले विमान थेट पाण्यात लँड करावे लागले.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ काही क्षणांत व्हायरल

हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विमान बिचकडे येत असल्याचे दिसताच लोकांचा उडालेला थरकापसुद्धा पाहण्यासारखा आहे. या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर तो काही क्षणांत व्हायरल झाला आहे. दरम्यान, ही दुर्घटना घडली त्यावेळी कोका बीचच्या वर एक एअर शो सुरु होता ( Cocoa Beach Air Show) ही घटना घडल्यानंतरसुद्दा हा एअर शो थांवण्यात आला नाही.

इतर बातम्या :

आग ओकणाऱ्या उन्हात गरोदर महिला DSP कोरोना ड्युटीवर उभी, दीड शहाणे मात्र थोबाड वर करुन भटकंतीला

Video: मास्क का घातला नाही म्हणून जोडप्याला पोलिसांनी ‘हटकलं’, तर बया थेट ‘किसवर’ आली, बघा काय घडलं?

मुकेश अंबानी यांच्या वाढदिवशी टीना अंबानी यांनी शेअर केला हा सुंदर फोटो, सोबत मनाला भावणारी पोस्टही

(viral video of airplane emergency landing on beach people get shocked)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें