मुकेश अंबानी यांच्या वाढदिवशी टीना अंबानी यांनी शेअर केला हा सुंदर फोटो, सोबत मनाला भावणारी पोस्टही

टीना अंबानी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून मुकेश अंबानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (This beautiful photo shared by Tina Ambani on Mukesh Ambani's birthday, along with a heartwarming post)

मुकेश अंबानी यांच्या वाढदिवशी टीना अंबानी यांनी शेअर केला हा सुंदर फोटो, सोबत मनाला भावणारी पोस्टही
मुकेश अंबानी यांच्या वाढदिवशी टीना अंबानी यांनी शेअर केला हा सुंदर फोटो

मुंबई : बिझनेस टायकून मुकेश अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण, मुकेश अंबानीचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोसोबत त्यांनी मनाला भावणारी एक पोस्टही लिहिली आहे, ज्याचे लोक जोरदार कौतुकही करीत आहेत. वास्तविक, टीना अंबानी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून मुकेश अंबानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (This beautiful photo shared by Tina Ambani on Mukesh Ambani’s birthday, along with a heartwarming post)

जुना फोटो शेअर करीत दिल्या शुभेच्छा

टीना अंबानी यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये मुकेश अंबानी, अनिल अंबानीसोबत त्या स्वत: दिसत आहेत. फोटोसोबत त्यांनी लिहिले की, ‘प्रेम करणारे मुलगा, मेहुणा, भाऊ, वडील, आजोबा मुकेश अंबानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपण सदैव निरोगी व आनंदी रहा’ अशी शुभेच्छा. याशिवाय टीना अंबानी यांनी आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये टीना अंबानी आणि मुकेश अंबानी दिसत आहेत. हा फोटो खूप जुना आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सोशल मीडियावर शेअर होताच हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. फोटोला आठ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तथापि लोकं या फोटोवर सातत्याने कमेंट करत आहेत आणि मुकेश अंबानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत ​​आहेत. टीना अंबानी यांनी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना गेल्या महिन्यातच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे मुकेश अंबानी सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकही आहेत. फोर्ब्सने अलीकडेच भारतातील 10 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांमध्ये त्यांना प्रथम स्थान दिले. (This beautiful photo shared by Tina Ambani on Mukesh Ambani’s birthday, along with a heartwarming post)

इतर बातम्या

Fact Check | Oxygen Level : कापूर, लवंग, ओवा आणि नीलगिरी तेलामुळे वाढवू शकते ऑक्सिजन पातळी? जाणून घ्या सत्य

आता लस तयार करण्यासाठी 4500 कोटींच्या क्रेडिटला मंजुरी, केंद्राचा मोठा निर्णय