Video: घराबाहेर ठेवलेला भोपळा अस्वलाने खाल्ला, व्हिडीओ पाहून नेटकरी खूश

या व्हिडिओमध्ये एक अस्वल दिसत आहे, ज्यामध्ये तो मजेशीर पद्धतीने भोपळा खात आहे. हा व्हिडिओ इतका गोंडस आहे की तो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video: घराबाहेर ठेवलेला भोपळा अस्वलाने खाल्ला, व्हिडीओ पाहून नेटकरी खूश
भोपळा खाणारं अस्वल


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे एक असे ठिकाण आहे, जिथं कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. जेव्हा तुम्ही सर्व तुमचे सोशल मीडिया स्क्रोल करत असाल, तेव्हा तुम्हाला प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. आता असाच एका प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला

आहे. या व्हिडिओमध्ये एक अस्वल दिसत आहे, ज्यामध्ये तो मजेशीर पद्धतीने भोपळा खात आहे. हा व्हिडिओ इतका गोंडस आहे की तो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अस्वलाचा हा व्हिडिओ युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. ( Viral video of bear ate pumpkin in a unique way people will laugh after watching this)

अस्वलाचा हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही ‘रिंग’ नावाच्या अकाऊंटवर व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना, पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘या अस्वलाने नवीन पद्धतीने बाहेरचं जेवण खाल्लं’ व्हिडिओमध्ये पाहू शकता की, घराच्या दाराबाहेर एक अस्वल दिसतो आहे आणि तो मोठ्या आनंदाने भोपळा खातो आहे.

पाहा व्हिडीओ:

 

 

या व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लाईक्स आणि भरपूर कमेंट्स आल्या आहेत. तसेच, असे काही युजर्स आहेत ज्यांनी फेसबुक पेज Ring ला विनंती केली आहे की असेच मजेदार व्हिडिओ शेअर करत राहा.

या व्हिडिओवरील एका युजरने लिहिले, ‘हे अस्वल खूप गोंडस आहे’ दुसऱ्याने लिहिले, ‘प्राण्यांचे बरेच व्हिडिओ पाहिले, पण हा व्हिडिओ खूप गोंडस आणि गोड आहे’ याशिवाय अनेकजण इमोजीजद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

हेही पाहा:

Video: गर्भवती महिला ट्रेनरवर अस्वलाचा हल्ला, जमिनीवर पाडून नखांचे ओरखडे, हादरवून सोडणारा व्हिडीओ

Video: प्रशिक्षकालाच माकडाचा जोरदार रपाटा, व्हिडीओ पाहून नेटकरी हसून लोटपोट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI