AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | शहरात अडकलेल्या राजाची घालमेल, म्हणतो “काय सांगू राणी मला गाव सुटेना”; कवितेची महाराष्ट्रभर चर्चा

नोकरीनिमित्त शहरामध्ये स्थायिक झालेल्या गावाकडच्या तरुणांनी तर ही कविता अक्षरश: डोक्यावर घेतली आहे. या कवितेची सध्या भन्नाट चर्चा होतेय. (marathi poem video goes viral)

Video | शहरात अडकलेल्या राजाची घालमेल, म्हणतो काय सांगू राणी मला गाव सुटेना; कवितेची महाराष्ट्रभर चर्चा
viral marathi poem
| Updated on: May 09, 2021 | 5:04 PM
Share

मुंबई : विकास आणि पैशांच्या हव्यासापोटी आपल्या भोवताली अनेक सारे बदल झाले आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे तर माणसाच्या राहणीमानामध्येसुद्धा बदल झालाय. शहराची, झगमगाटीची झूल पांघरून आज मानव हा फक्त पळतोय. सुख, आत्मसमाधान, मन:शांती हे सारं काही बाजूला ठेवून आपण कोठे जातोय, याची माणसालाच खबर राहिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर शहर आणि गावाच्या संस्कृतीमधील मोठी दरी दाखवणारी एक कविता चांगलीच व्हायरल होत आहे. नोकरीनिमित्त शहरामध्ये स्थायिक झालेल्या गावाकडच्या तरुणांनी तर ही कविता अक्षरश: डोक्यावर घेतली आहे. या कवितेची सध्या भन्नाट चर्चा होतेय. (kaay sangu rani mala gav sutena marathi poem video goes viral on social media sung by Ganesh Shinde)

कवितेमध्ये काय आहे ?

या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडीओमध्ये कवी गणेश शिंदे कार चालवताना दिसतायत. तर दुसरी व्यक्ती या कवितेची रेकॉर्डींग करत आहे. सोबतच ही व्यक्ती कवीला कोरस म्हणून साथसुद्धा देतेय. कवितेमध्ये एक तरुण आपल्या पत्नीला म्हणजेच त्याच्या राणीला गावाची कहाणी सांगतोय असं वाटतंय. तो सध्या शहरामध्ये स्थायिक झाल्यामुळे त्याचा गावापासून संपर्क सुटला आहे. अचानक गावाची आठवण आल्यामुळे तो माझ्या गावामध्ये काय काय आहे आणि सध्या शहराची संस्कृती कशी आहे याची सगळी कहाणी सांगतोय.

थेट काळजाला भिडणारे शब्द

या कवितेत कोणतेही जड शब्द वापरलेले नाहीत. अनाकलनीय शब्द वापरून कविता अवघड बनवण्यापेक्षा कवीने ही कविता सोपी आणि सुटसुटीत केली आहे. या कवितेत तो गावाकडची दिवाळी, होळी या सणांच तोंडभरून कौतुक करतोय. तसेच सध्या शहरात जिन्सच्या कापडांची संस्कृती आली आहे. मलासुद्धा या बंद गळ्याच्या कोटामध्ये अवघडल्यासारखं वाटतंय, असं तो आपल्या राणीला सांगतोय.

कवितेतील काही ओळी

बंद गळ्यामंदी मावेना ग अंग जिन्सच्या कापडामंदी दुनिया झाली कशी दंग जो तो राणी आपल्या धुंदीमध्ये दंग माणासने माणसाचे सोडले का रंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटेना काय सांगू राणी मला गाव सुटेना

पाहा कवितेचा व्हिडीओ :

अशा मार्मिक शब्दांत या कवीने त्याचे गावाबद्दल असलेले प्रेम सांगितले आहे. पुढे या कवितेत कवी आजकालची पोरे शहरामध्ये छोटे-छोटे कपडे घालून शाळा तसेच कॉलेजमध्ये जात आहेत, असं कवी म्हणतो. तसेच कॉलेजमध्ये जाऊनसुद्धा त्यांची पाटी अजूनही कोरीच असून अजूनही ते खरं शिक्षण घेतंच नाहीयेत असंसुद्धा कवी म्हणतोय. तर दुसरीकडे गावाकडे माझी आजी आता म्हातारी झाली आहे, तरी तिच्या डोईवरचा पदर पडत नाहीये, असे हा कवी सांगतोय.

दरम्यान, ही कविता कवी गणेश सिंदे यांची स्वत:ची असून नंतर या तिला Dynamic Darsh या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलंय. या कवितेला सध्या एकूण 8 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. फेकसबूक आणि ट्विटरवरसुद्धा ही कविता चांगलीच व्हायरल झालीये.

इतर बातम्या :

आपल्या फांदीवर बसणाऱ्या प्रत्येक पक्ष्याचा जीव घेतं हे झाड, म्हणून त्याला ‘बर्ड किलर’ म्हणतात

Video | घरासमोर येताच आकाश उजळलं, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी, नव्या नवरीची ‘रॉयल एन्ट्री’ पाहाच

Video | जिवंत माशांनी भरलेला ट्रक उलटला, लोकांची मासे पकडण्यासाठी झुंबड

(kaay sangu rani mala gav sutena marathi poem video goes viral on social media sung by Ganesh Shinde)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.