Viral Video : किंग कोब्राची थरारक शिकार, सापाला ‘नूडल्स’ प्रमाणे गिळलं आणि…
King Cobra Eating Another Snake Video : किंग कोब्राचा हा थराराक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @jayprehistoricpets या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये कोब्राने चक्क दुसऱ्या सापाची शिकार केली आणि पाहता पाहता त्याने त्याला गिळलंच..

साप.. विविध सापांबद्दल आपल्याला उत्सुकता आणि भीती दोन्ही असतेच. सापांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर फिरत असतात. असाच एका किंग कोब्राचा (King Cobra) हैराण करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे आश्चर्याने अगदी विस्फारले असून लोकांनी त्यावर विविध कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया लिहील्या आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये, जगातील सर्वात मोठ्या विषारी सापांपैकी एक असलेला किंग कोब्रा अजगराची शिकार करताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर किंग कोब्रा अजगराला “नूडल्स” सारखा गिळताना त्या व्हिडिओमध्ये दिसतो आणि काही वेळातच तो त्याला अगदी सहज, पूर्णपणे गिळून टाकतो. हे थरकाप उडवणारं दृश्य समोर आलं आहे.
किंग कोब्रा का खातो साप ?
खरं तर, त्याचे वैज्ञानिक नाव “ओफिओफॅगस हन्ना” आहे, जिथे “ओफिओफॅगस हॅन्नाह” (Ophiophagus Hannah) म्हणजे साप खाणारा असं असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किंग कोब्राचा 75 टक्क्यांहून अधिक आहार इतर सापांवर अवलंबून असतो. रॅट स्नेक्स हे त्याची आवडती शिकार असतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ते इतर विषारी कोब्रा, क्रेट्स आणि सापांचीही शिकार करतात. ते लहान अजगरांनाही अगदी सहज गिळंकृत करतात.
लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे, हा धोकादायक साप अगदी 10-12 फूट लांब असलेलं भक्ष्यही सहजपणे गिळू शकतो. तज्ञांच्या मते, किंग कोब्रामध्ये इतर सापांच्या विषासाठी नैसर्गिक प्रतिकार क्षमता असते. ज्यामुळेच ते इतर कोणत्याही विषारी सापानांही खाऊ शकतात, आणि त्यांना कोणताही त्रास देखील होत नाही.
इथे पहा व्हिडीओ
View this post on Instagram
किंग कोब्राचा हा अगदी बयानक व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @jayprehistoricpets या नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 23 लाख वेळा पाहिला गेला असून 55 हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध कमेंटस करत आश्चर्यही व्यक्त केलं आहे.
किंग कोब्राने अजगराला गिळलं तर खरं, पण आता तो पचवण्यासाठी कोब्राला किती वेळ लागेल?, असा सवाल एक यूजरने विचारला. तर शिकार इतकी मोठी आहे, मग त्याची शिकार करणारा आणि त्याला गिळणारा किंग कोब्रा कित्ती मोठा असेल, असे म्हणत आणखी एका यूजरने आश्चर्य व्यक्त केलं. अशा विविध कमेंट्स यावर आल्या असून निसर्गाचा हा चमत्कार आणि किंग कोब्राची अफाट ताकद पाहून लोक स्तिमित झालेत हे नक्कीच.
