AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आत राहिलो तर डसतोय, उडी मारली तर जीव जातोय… धावत्या लोकलमध्ये साप शिरताच मोठा थरार; प्रवाशांची वाचाच बसली

ट्रेनच्या एसी कोचमध्ये साप दिसताच प्रवाशाची आरडाओरड. संपूर्ण कोचमधील प्रवाशी घाबरले. कोणी वरच्या सीटवर तर कोणी.....नेमकं काय घडलं?

आत राहिलो तर डसतोय, उडी मारली तर जीव जातोय... धावत्या लोकलमध्ये साप शिरताच मोठा थरार; प्रवाशांची वाचाच बसली
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 19, 2026 | 7:44 PM
Share

Train Viral Video : अजमेरहून जबलपूरकडे जाणाऱ्या दयोदय एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये रविवारी सायंकाळी घडलेल्या एका विचित्र घटनेने प्रवाशांची तारांबळ उडवली. चालत्या ट्रेनमध्ये अचानक साप आहे… साप आहे… अशा किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या आणि काही क्षणांतच संपूर्ण कोचमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जवळपास दोन तास प्रवासी दहशतीच्या सावटाखाली प्रवास करत राहिले.

नेमकं काय घडलं?

ट्रेनमध्ये हे भीतीचं वातावरण तेव्हा सुरू झालं जेव्हा एका प्रवाशाच्या नजरेस सीटखाली सापासारखी एक गोष्ट दिसली. त्याने ती पाहताच क्षणाचाही विलंब न करता आरडाओरड सुरु केली. पाहता पाहता ही बातमी संपूर्ण एसी कोचमध्ये पसरली. काही प्रवासी घाबरून आपल्या जागा सोडून उभे राहिले तर काही जणांनी लहान मुलांना आणि आपले सामान घेऊन सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. साप नेमका कुठे आहे आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे कुणालाच समजत नव्हतं.

संध्याकाळी सुमारे 7 वाजताच ट्रेनमध्ये साप असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. त्यानंतर प्रशासन तात्काळ अलर्ट मोडवर गेलं. ट्रेन कोटा स्टेशनला पोहोचण्यापूर्वीच स्नेक कॅचर गोविंद शर्मा यांना पाचारण करण्यात आलं. दरम्यान, आरपीएफचे जवान माधोपुर ते कोटा दरम्यान सतत एसी कोचवर लक्ष ठेवून शोध घेत होते.

कोटा स्टेशनवर सखोल तपासणी

रात्री सुमारे 10 वाजता दयोदय एक्सप्रेस कोटा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर दाखल झाली. प्लॅटफॉर्मवर आधीपासूनच स्नेक कॅचर आणि आरपीएफचे जवान उपस्थित होते. ट्रेन थांबताच एसी कोच-1 आणि एसी कोच-2 मध्ये सापाची तपासणी सुरू करण्यात आली. जवळपास 10 मिनिटे सीटखाली, बर्थ, गॅलरी आणि कोचच्या प्रत्येक कोपऱ्यात बारकाईने पाहणी करण्यात आली. मात्र, कोणताही साप आढळून आला नाही.

तपासणीदरम्यान प्रवाशांची चौकशी केली असता या संपूर्ण गोंधळामागचं सत्य समोर आलं आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एका लहान मुलाकडे सुमारे दीड फूट लांबीचा नकली साप होता. प्रवासादरम्यान ते मूल त्या खेळण्याशी खेळत होतं. खेळता-खेळता तो नकली साप त्याच्या हातातून निसटून सीटखाली पडला. त्याच वेळी एका प्रवाशाच्या नजरेस तो पडला आणि त्याने तो खरा साप समजून आरडाओरड केली ज्यामुळे संपूर्ण कोचमध्ये घबराट पसरली.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.