तात्या विंचूसारखी महाभंयकर बाहुली बाजारात, लाबुबू डॉल खरंच मुलांसाठी धोकादायक? सत्य काय?
लाबुबू डॉलला धोकादायक समजण्याचा संशय एका इन्स्टाग्राम व्हिडीओपासून सुरू झाला, ज्यामध्ये लाबुबू डॉल एका भयावह आकृतीजवळ दाखवली गेली होती. चला, जाणून घेऊया संपूर्ण सत्य काय आहे...

लक्ष्मीकांत बेर्डेचा झपाटलेला सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. त्यातील लक्ष्याचा जीव घेण्यासाठी त्याच्या मागे लागलेला तात्या विंचूही आठवत असेल. हा खतरनाक तात्या विंचू बाहुला त्यावेळी खूपच चर्चेत आला होता. पण या तात्या विंचूपेक्षाही महाखतरनाक बाहुला बाजारात आला आहे. या बाहुल्यात शैतानी ताकद असल्याचं म्हटलं जातंय. लाबुबू डॉल (Labubu Doll) असं या बाहुल्याचं नाव आहे. सध्या सोशल मीडियावर या डॉलची बरीच चर्चा सुरू आहे. नेटिजन्सला तर ही डॉल पाहून घाम फुटला आहे. या डॉलमध्ये सैतानी शक्ती असून ती एका प्राचीन दानवाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी ही डॉल खतरनाक मानली जात आहे. पण खरोखरच अशी डॉल आहे का? की ही अफवा आहे? काय आहे डॉल मागचं सत्य?
लाबुबूला शैतानी समजण्याचा संशय कसा निर्माण झाला?
लाबुबू डॉल या बाहुलीला ‘शैतानी’ समजण्याचा संशय एका इन्स्टाग्राम व्हिडीओपासून सुरू झाला, ज्यामध्ये लाबुबू डॉल एका भयावह आकृतीजवळ दाखवली गेली होती. या व्हिडीओसोबतच प्रसिद्ध अमेरिकन अॅनिमेटेड सिटकॉम ‘द सिम्पसन्स’ (The Simpsons) मधील एक सीन जोडला गेला, ज्यामध्ये एक महिला चुकून एका शैतानाचा पुतळा विकत घेते आणि तिचे मूल त्याच्या ताब्यात येते. याच आधारावर नेटिझन्सनी लाबुबूला शैतानी बाहुली मानले आणि ही अफवा सोशल मीडियावर तुफान पसरली आहे.
लाबुबू डॉलचे सत्य काय आहे?
खरेतर, लाबुबू ही एक बाहुली आहे, जी 2015 मध्ये कलाकार कासिंगलुंग (Kasinglung) यांनी बनवली होती. ही बाहुली ‘द मॉन्स्टर्स (The Monsters)’ नावाच्या कथेचा भाग आहे, ज्यामध्ये तिला मुलांसाठी एक खोडकर पण चांगली परी असे पात्र दाखवले आहे. 2019 मध्ये चीनच्या प्रसिद्ध कंपनी पोप मार्ट (Pop Mart) ने ही बाहुली बाजारात आणली आणि तेव्हापासून ती जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली. एकंदरीत, ही एका कलाकाराच्या कल्पनेतून निर्माण झालेली निरागस आणि मजेदार बाहुली आहे.
View this post on Instagram
पाजुजुशी काय आहे संबंध?
लाबुबूला प्राचीन मेसोपोटामियाई राक्षस पाजुजु (Pazuzu) शी जोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पाजुजु राक्षसाला हॉलिवूडच्या भयपट चित्रपट ‘द एक्सोरसिस्ट’ (The Exorcist) मध्येही दाखवले गेले होते. तथापि, स्नोप्स आणि ब्रिटानिका यांसारख्या प्रतिष्ठित तथ्य-तपासणी वेबसाइट्सनी या दाव्याला पूर्णपणे अफवा ठरवले आणि पुष्टी केली की लाबुबू आणि पाजुजु यांच्यात कोणतीही समानता नाही.
