Video : जगातील सर्वात क्यूट पिझ्झा लव्हर!, पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला, चिमुकलीचे एक्सप्रेशन पाहून फॅन व्हाल…

'emotional.babies' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हायरल व्हीडिओ लाखो वेळा वेळा पाहिला गेला आहे आणि पोस्टला 11 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

Video : जगातील सर्वात क्यूट पिझ्झा लव्हर!, पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला, चिमुकलीचे एक्सप्रेशन पाहून फॅन व्हाल...
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jun 04, 2022 | 11:13 AM

मुंबई : पिझ्झा खायला कुणाला आवडत नाही? आपण सगळेच पिझ्झाचे फॅन आहोत. पण तुम्ही कधी जगातील सर्वात क्यूट पिझ्झा फॅन पाहिली आहे का? नसेल आज तुमची या बबली पिझ्झा लव्हरशी (Pizza Lover) भेट होणार आहे. एका क्युट मुलीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात ही क्युट मुलगी पिझ्झा खातान दिसतेय. ही क्युट मुलगी पहिल्यांदा पिझ्झा खातेय.. पिझ्झा खाल्यानंतर तिचे एक्सप्रेश पाहून तुम्ही तिचे फॅन व्हाल. या चिमुकलीला पिझ्झा आवडलेला दिसतोय. पहिला घास खाल्ल्यानंतर ती डोळे मिटते अन् पिझ्झा इजॉय करते.

व्हायरल व्हीडिओ

एका क्युट मुलीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ही क्युट मुलगी पिझ्झा खातान दिसतेय. ही क्युट मुलगी पहिल्यांदा पिझ्झा खातेय.. पिझ्झा खाल्यानंतर तिचे एक्सप्रेश पाहून तुम्ही तिचे फॅन व्हाल.

एक्सप्रेशन क्विन

या चिमुकलीला पिझ्झा आवडलेला दिसतोय. पहिला घास खाल्ल्यानंतर ती डोळे मिटते अन् पिझ्झा इजॉय करते. तिचे एक्स्प्रेशन अनेकांच्या काळजात घर करत आहेत. तिचा हा व्हीडिओ शेअर करताना तुमच्या ओळखीच्या पिझ्झा लव्हरला टॅग करा, असं कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Baby (@emotional.babies)

’emotional.babies’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हायरल व्हीडिओ लाखो वेळा वेळा पाहिला गेला आहे आणि पोस्टला 11 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. 5,000 हून अधिक लोकांनी व्हीडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

कमेंट बॉक्स

एवढा क्युट व्हीडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं आहे की, “मला ही मुलगी खूप आवडली आहे. तिचे एक्सप्रेशन कमाल आहेत.” दुसरा म्हणतो “पिझ्झा इज लाइफ.” तिसऱ्याने तिला जगातील सर्वात क्युट पिझ्झा लव्हर म्हटलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें