या चिमुकलीने मांजराला जबरदस्ती पकडून पेंटिंग करायला लावलंय, आजवरचा सगळ्यात क्युट व्हिडीओ
ज्यामध्ये एक लहान मुलगी आपल्या पाळीव मांजरीला चित्र रंगवायला शिकवतीये.

लहान मूल आणि पाळीव प्राणी यांच्यात एक अतूट नातं असतं. जणू काही ते एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात. इतकंच नाही तर आपल्या भावंडांपेक्षाही ते आपल्या पाळीव प्राण्यांसोबत खेळण्यात रमतात. कुटुंबातील पाळीव प्राण्याशी मुलाचं जे नातं तयार होतं, ते सगळ्यात खास असतं. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालाय, ज्यामध्ये एक लहान मुलगी आपल्या पाळीव मांजरीला चित्र रंगवायला शिकवतीये. या व्हिडिओमध्ये मुलगी स्केचवर जांभळ्या रंगाची पेन्सिल फिरवताना दिसतीये, तिने मांजराचा पंजा हातात धरला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मांजर हे करत असताना कॅमेऱ्याकडे मूकपणे पाहत राहते आणि दोघी एकत्र चित्र रंगवत असतात.
आरडाओरडा न करता मांजरीने आपल्या मैत्रिणीने तिला जे करायला सांगितले होते तेच केले. ही क्लिप @buitengebieden नावाच्या ट्विटर पेजवर शेअर करण्यात आली आहे, ज्यात अनेकदा प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडिओ शेअर केले जातात.
“Why, just why mommy?” – cat ? pic.twitter.com/qIBLOtaPNW
— Buitengebieden (@buitengebieden) November 1, 2022
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं होतं. ‘का, का आई कशाला?- मांजर’. या व्हिडीओमध्ये मांजर अशा क्यूटनेसने बसली आहे, जे पाहून सगळेच हसतायत.
1 नोव्हेंबररोजी शेअर केल्यापासून या क्लिपला 20,000 हून अधिक रीट्वीट आणि 1.54 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया यूजर्सना हा क्यूट व्हिडिओ आवडलाय.
या व्हिडीओमध्ये काहींनी आपल्या मित्रांना टॅग केलं, तर काहींनी मांजरांच्या अशाच क्लिप्स शेअर करत राहण्यास सांगितलं.
