Video: गावातल्या रस्त्यावर ‘डेंजरस’ डान्स, लोक म्हणाले,’मायकल जॅक्सन पुन्हा जिवंत झाला’

या व्हिडिओमधील व्यक्तीची कुणी तारीफ करत आहे तर कुणी त्याच्या कलेची दाद देत आहे, तर कुणी खंत व्यक्त करत आहे की आपल्याकडे टॅलेंट असूनही त्यांना संधी मिळत नाही.

Video: गावातल्या रस्त्यावर 'डेंजरस' डान्स, लोक म्हणाले,'मायकल जॅक्सन पुन्हा जिवंत झाला'
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक माणूस हुबेहुब मायकल जॅक्सनसारखा नाचत आहे

सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस रस्त्यावर नाचताना दिसत आहे. या व्यक्तीच्या नृत्याचा हा व्हिडिओ प्रत्येकाला आवडेल असा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक माणूस रस्त्यावर नाचत आहे आणि तिथे उभे असलेले लोक त्याची स्तुती करत आहेत. उपस्थित लोक मोठ्या आनंदाने आणि आश्चर्याने त्याचा डान्स बघत आहेत. बॅकग्राऊंडला मायकल जॅक्सनचं ‘डेंजरस’ गाणं वाजत आहे. व्हिडिओमध्ये नाचणारी व्यक्ती मायकल जॅक्सनच वाटते आहे. ( man-amazing-street-dance-performance-reminds-netizens-of-michael-jackson-watch-viral-video-dangerous-song)

कावेरी नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘मायकल जॅक्सनचं भूत या माणसाच्या आत शिरलं आहे.’ मायकल जॅक्सनच्या सर्वात गाजलेल्या अल्बममधलं हे गाणं असून तो अल्बम 1991 मध्ये रिलीज झाला होता.

पाहा व्हिडीओ:

 

सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. लोकांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे, त्यामुळे अनेकजण तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत. या व्हिडिओमधील व्यक्तीची कुणी तारीफ करत आहे तर कुणी त्याच्या कलेची दाद देत आहे, तर कुणी खंत व्यक्त करत आहे की आपल्याकडे टॅलेंट असूनही त्यांना संधी मिळत नाही. आतापर्यंत हा व्हिडिओ 80 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

लोक व्हिडिओवर व्यक्त होत आहेत. एका युजरने यावर लिहलं की, ‘ही व्यक्ती डान्समध्ये खूप चपळ आणि लवचिक आहे. दुसऱ्या युजरने लिहिले,’ही व्यक्ती कुठल्याही उत्तम कोरिओग्राफरपेक्षा कमी नाही.’ या व्यतिरिक्त, काही लोकांनी बॉलिवूड कोरिओग्राफर्सनी टॅग केलं आहे, जेणेकरून ते त्या व्यक्तीची प्रतिभा पाहून त्याला काम देऊ शकतील. अनेक लोकांनी इमोजीज द्वारे आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

हेही पाहा:

Video | मादीला मिळवण्यासाठी तीन सापांमध्ये जुंपली, भांडण सोडवण्यासाठी सर्पमित्राला घ्यावी लागली मेहनत

पठ्ठ्याने लग्न केलं, तेही प्रेशर कुकरसोबत, चारच दिवसात घटस्फोटही घेतला, कारण असंच चकित करणारं !

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI