Viral | ढोल-ताशाचा आवाज ऐकून बेभान, जमिनीवर लोळून नाचायला लागला, नंतर बसला मार, व्हिडीओ व्हायरल

काही व्हिडीओंना पाहून आपण हसून-हसून लोटपोट होतो. डान्सचे व्हिडीओ तर नेटकऱ्यांना खूप आवडतात. सध्या एक व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाची डान्स करण्याची पद्धत नेटकऱ्यांना खूप आवडली आहे.

Viral | ढोल-ताशाचा आवाज ऐकून बेभान, जमिनीवर लोळून नाचायला लागला, नंतर बसला मार, व्हिडीओ व्हायरल
dance viral video

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर रोज वेगवेगळे व्हिडीओ समोर येतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हसून-हसून लोटपोट होतो. डान्सचे व्हिडीओ तर नेटकऱ्यांना खूप आवडतात. याच कारणामुळे सध्या एक व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाची डान्स करण्याची पद्धत नेटकऱ्यांना खूप आवडली आहे. (man dancing in ceremony in crazy way funny video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक समारंभ दिसत आहे. सगळे आनंदात असल्यामुळे ढोल आणि ताशांच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला आहे. यावेळी एका माणसाला डान्स करणे कंट्रोल झालेले नाही. तो सगळं काही विसरून बेभान होऊन डान्स करत आहे. विशेष म्हणजे डान्स करताना आपण खाली कोसळत आहोत की काय याचेही त्याला भान नाही. नाचत असताना व्हिडीओतील माणसू ढोल वाजवणाऱ्या माणसाच्या अंगावर जाऊन पडला आहे. नाचणारा माणूस ढोल वाजवणाऱ्या माणसाच्या पायात लोळण घेत आहे. तरीदेखील जमिनीवर पडलेला माणूस नाचत आहे.

मार बसल्यामुळे माणूस लगेच शुद्धीवर आला

बेभान झालेल्या माणसाची ही करामत ढोल वाजवणाऱ्या माणसाला आवडलेली नाही. त्याने ढोल वाजवताना खाली लोळून डान्स करणाऱ्या माणसाला मारणे सुरु केले आहे. जोरजोरात मार बसल्यामुळे डान्ससाठी बेभान झालेला हा माणूस लगेच शुद्धीवर आला आहे. काही क्षणांत त्याने तिथून पळून काढला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल झालेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर pollywood.attitude या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या :

Video | कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी वाघ, अस्वल झाले, नको त्या उचापत्या चांगल्याच भोवल्या; नेमकं काय घडलं एका पाहाच !

VIDEO : जपानी पोरींचा बॉलिवूडच्या गाण्यावर हटके डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Video | लग्नविधी सुरु, नवरी-नवरदेव खूश, मध्येच नातेवाईकांनी भलताच खेळ मांडला, व्हिडीओ व्हायरल

(man dancing in ceremony in crazy way funny video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI