Video | कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी वाघ, अस्वल झाले, नको त्या उचापत्या चांगल्याच भोवल्या; नेमकं काय घडलं एका पाहाच !

सध्या दोन माणसांच्या एका वेगळ्याच कारनाम्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. नको त्या उचापत्या केल्यामुळे व्हिडीओतील माणसं चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

Video | कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी वाघ, अस्वल झाले, नको त्या उचापत्या चांगल्याच भोवल्या; नेमकं काय घडलं एका पाहाच !
tiger bear viral video


मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनके व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. सध्या दोन माणसांच्या एका वेगळ्याच कारनाम्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. नको त्या उचापत्या केल्यामुळे व्हिडीओतील माणसं चांगलेच अडचणीत सापडले आहेत. (people wore Tiger and Bear dress trying to scare dogs video went viral on social media)

कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी घेतलं वाघ,अस्वलाचं रुप 

माणूस आणि प्राण्यांमध्ये जवळचे नाते आहे. या अतुट नात्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मात्र दोन माणसांनी एक वेगळीच करामत केली आहे. या माणसांनी कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी चक्क वाघ आणि अस्वलाचं रुप धारण केलं आहे. मात्र, अशा प्रकारचं रुप धारण करणं त्यांना चांगलंच भोवलं आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून हसून लोटपोट झाले आहेत.

दोन्ही माणसे कुत्र्यांना भीती घालत आहेत

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन माणसांनी वाघ आणि अस्वलाचा वेष परिधान केला आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावर ते हुबेहूब वाघ आणि अस्वलासारखे दिसत आहेत. त्यांच्या समोर काही कुत्रे बसले आहेत. याच कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी ते आलेले आहेत. हे दोघेही कुत्र्याकडे येऊन त्यांना भीती घालत आहेत. मात्र, या माणसांना वाघ आणि अस्वलाच्या कपड्यांमध्ये पाहताच कुत्रे त्यांच्या अंगावर धावले आहेत.

कुत्र्यांनी माणसांना घेरलंं 

कुत्र्यांनी या माणसांवर चांगलाच हल्ला केला आहे. कुत्र्यांनी हल्ला करताच वाघाचे कपडे घातलेला एक माणूस पळून गेला आहे. तर अस्वलाचे कपडे घातलेल्या माणसाला कुत्र्यांनी घेरलेय. सर्व कुत्रे त्या माणसावर हल्ला करत आहेत. कुत्र्यांनी अचानकपणे केलेल्या हल्ल्यामुळे व्हिडीओतील माणसू चांगलाच गोंधळला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला फेसबुकवर अपलोड करण्यात आले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच हा व्हिडीओ आवडीने शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO : जपानी पोरींचा बॉलिवूडच्या गाण्यावर हटके डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Video | लग्नविधी सुरु, नवरी-नवरदेव खूश, मध्येच नातेवाईकांनी भलताच खेळ मांडला, व्हिडीओ व्हायरल

Video | इवल्याशा दुचाकीवर डोंगराएवढं सामान, हेवी ड्रायव्हरची हिम्मत एकदा पाहाच

(people wore Tiger and Bear dress trying to scare dogs video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI