तरुणींना मिठीत घ्या, मिळवा हजारो रुपये, तरुणांसाठी नवा बिझनेस; अजब ट्रेंडची तुफान चर्चा!
Man Mum Trend: भारताच्या शेजारील देशात एक नवा ट्रेन्ड सुरू झाल आहे. मनमून ट्रेन्ड असे त्याचे नाव आहे. यात अनेक तरूणी मुलांना भेटायला बोलवतात, त्यांनी मिठी मारतात आणि पैसे देतात, हा ट्रेन्ड नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.

जगातील विविध देशांमध्ये वेगवेगळे ट्रेन्ड फॉलो केले जातात. तुम्ही याआधी ऐकले असेल की दक्षिण कोरियामध्ये भाड्याने नवरा किंवा बायको मिळते. मात्र आता चीनमध्ये नवा ट्रेन्ड समोर आला आहे. मनमून ट्रेन्ड असे त्याचे नाव आहे. या ट्रेन्ड खूप खास आहे कारण यात जिममध्ये जाणारे तरूण तरीणींना मिठी मारून चांगले पैसे कमवतात. हा ट्रेंड व्हायरल झाला आहे. हा ट्रेंन्ड नेमका काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
चीनमध्ये लग्न न करणाऱ्या तरूणींची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनेक मुली नोकरी किंवा बिझनेस करून चांगले पैसे कमवत आहेत. मात्र अशा तरूणी या एकट्या पडल्या आहेत, त्यांना भावनिक आधाराची गरज आहे. त्यामुळे त्या मुली हा मनमून ट्रेन्ड फॉलो करतात. त्या सुंदर मुलांकडून हग करण्याची सेवा घेतात, यामुळे त्यांना भावनिक आधार मिळतो, यासाठी त्या मुलांना 5 मिनिटांसाठी 20 ते 50 युआन (250 ते 600 रुपये) देतात.
हा अजब ट्रेंड कसा सुरू झाला?
या अजब ट्रेन्डबाबत एका कॉलेजच्या तरूणीने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ‘मी अभ्यासामुळे तणावात आहे, मला फक्त एखाद्याला मिठी मारायची आहे. शाळेत मी एका मित्राला मिठी मारली तेव्हा माझे मन हलके झाले होते.’ या तरूणीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली, या पोस्टवर एक लाख लोकांनी कनेटम केली. यातून हग थेरपी ही संकल्पना उदयास आली आणि तिचे व्यवसायात रुपांतर झाले.
तणावत असलेल्या तरूणी या पुरुषांशी चॅट अॅप्सवर बोलतात आणि त्यांना पार्क, मेट्रो स्टेशन किंवा शॉपिंग मॉलमध्ये बोलवतात. सार्वजनिक ठिकाणी ते एकमेकांना हग करतात. एका तरूणीने याबाबत सांगितले की, मी तीन तासांच्या ओव्हरटाईमनंतर एका तरूणाला बोलवते. त्याने मला तीन मिनिटे मिठी मारली, माझ्या खांद्यावर थाप मारली, मी त्याला माझ्या बॉसबद्दल असणाऱ्या तक्रारी सांगितल्या, यानंतर माझे मन शांत झाले.’
मनमून ट्रेन्ड काय आहे?
मनमून हा शब्द जिममधील पुरूषासाठी वापरला जातो, मात्र आता त्याची व्याख्या बदलली आहे. मनमून म्हणजे भावनिक आधार देणारा पुरूष. एका तरूणाने याबाबत बोलताना सांगितले की, मी 34 तरूणींना मिठी मारली आहे आणि 1758 युआन कमावले आहेत. यामुळे अनेक महिलांचे मन हलके झाले. या सेवेसाठी अनेक तरूण रस्त्याच्या कडेला एक पोस्टर घेऊन उभे असतात. या तरुणांशी महिला संपर्क करतात आणि हग थेरपी घेतात.
