AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | आधी KitKatला धार काढली, मग किटकॅटनं चक्क टोमॅटोही कापला!

तुम्ही म्हणाल टोमॅटो कापण्यासाठी धारधार काहीतरी हवं. करेक्ट आहे! धारधार सुरी किंवा चाकूशिवाय टोमॅटो कापला जाऊच शकत नाही! पण जगात अशक्यही काहीच नाही. म्हणून एकानं चक्क किटकॅट कॅडबरीला धार दिली.

Viral Video | आधी KitKatला धार काढली, मग किटकॅटनं चक्क टोमॅटोही कापला!
Pic Courtesy - Instagram
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 3:22 PM
Share

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ (Viral Video) तुम्ही पाहिले असतील. त्यातही तुम्ही फुडी (Foodie) असाल तर वेगवेगळ्या डिश (Recipe) कशा बनवायच्या याचे तर अनेक व्हिडीओ रोजच व्हायरल होत असतात. पण जेवणात सर्रास वापरला जाणारा टोमॅटो (Tomato) कुणी चक्क कॅडबरीनं (Cadbury) कापल्याचं तुम्ही पाहिलंय का? नसेल पाहिलं, तर आता पाहून घ्या. कारण एकानं चक्क किटकॅट (KitKat) कॅडबरीला धार देत टोमॅटो कापण्याची किमया करुन दाखवली आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

तुम्ही म्हणाल टोमॅटो कापण्यासाठी धारधार काहीतरी हवं. करेक्ट आहे! धारधार सुरी किंवा चाकूशिवाय टोमॅटो कापला जाऊच शकत नाही! पण जगात अशक्यही काहीच नाही. म्हणून एकानं चक्क किटकॅट कॅडबरीला धार दिली. अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये किटकॅट कॅडबरीला धार देऊन टोमॅटो कापण्याचा डेमोही या पठ्ठ्यानं यशस्वीपणे करुन दाखवलाय. इन्टाग्रामवर (Instagram) हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

कुणी शेअर केला व्हिडीओ?

किटकॅटनं चॉकलेटचे दोन तुकडे करणारा या अवलियाचा व्हिडीओ शेअर केलाय व्हॉट हाऊ व्हाय स्टुडिओ  (whathowwhystudio) या इन्टाग्राम अकाऊंटवरुन. 1 लाख 20 हजारहून अधिक इन्स्टाग्राम युजर्स हा व्हिडीओ आतापर्यंत पाहून झालेले आहेत. आतापर्यंत जवळपास 20 हजार युजर्सनी हा व्हिडीओ लाईक केला असून 200 हून अधिक जणांनी या व्हिडीओवर कमेन्ट्स (Comments) केल्या आहेत. टोमॅटो कापण्याच्या या अजब-गजब प्रयोगाचं अनेकांनी कौतुक केलंय. तर काहींना हा प्रयोग खूपच भारी वाटलाय.

पाहा हा खास व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by Whathowhy (@whathowhystudio)

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीली हा प्रयोग एकदा करुन बघा. खरंच किटकॅटनं टोमॅटो कापणं शक्य आहे की अशक्य आहे, हे तर कळेलच. प्रयोग यशस्वी झाला, तर टोमॅटो कापण्यासाठी तुम्हाला सुरीऐवजी एक चांगला ऑप्शन मिळेल. आणि अयशस्वी झालाच, तर मग सुरी आहेच की!

आता तुम्ही असंही म्हणाल की सुरी असताना किटकॅटनं मुळात कापायचाच का टोमॅटो? तर असंय मंडळी की क्रिएटिव्हिटीपुढे लॉजिक नसतं. आणि जिथं लॉजिक असतं, तिथं क्रिएटिव्हिडी असेलच असं काही नाही. टोमॅटो कापणारा हा अवलिया लॉजिकल नसेलही, पण क्रिएटिव्ह आहे, हे तर मान्य करावंच लागेल ना?

महत्त्वाच्या बातम्या –

केंद्राकडून दूरसंचार कंपन्यांच्या नियमांमध्ये बदल; आता दोन वर्ष करावे लागणार डेटाचे जतन

किम शर्माचा लिएंडर पेस सोबत रोमान्स, Kiss करतानाचा फोटो झाला व्हायरल

तीन ग्लास, हार आणि चॉकलेट, डोंगरावर दोन तरुणी-एका तरुणाची आत्महत्या, मृतदेहाजवळ आढळलेल्या वस्तूंचा अर्थ काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.