Video |पिळदार देह, मनात दृढनिश्चय, पठ्ठ्याने कोणत्याही आधाराविना रॉडवर साधलं बॅलेन्स

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस दिसतोय. हा माणूस अंगाने धष्टपुष्ट आहे. पिळदार शरीर असल्यामुळे तो काहीतरी वेगळं करुन दाखवणार, याची कल्पना आपल्याला सुरुवातीलाच येते. त्याच्या हातात एक लोखंडी रॉड आहे. या रॉडला त्याने जमिनीवर उभं केलं आहे.

Video |पिळदार देह, मनात दृढनिश्चय, पठ्ठ्याने कोणत्याही आधाराविना रॉडवर साधलं बॅलेन्स
MAN VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या जगात एकापेक्षा एक करामती आणि वेगवेगळ्या कसरती करुन दाखवणारे लोक आहेत. या लोकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या मात्र, आश्चर्यात पाडणारा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने लोखंडी रॉडवर उभं राहत उत्तमरीत्या स्वत:चं बॅलेन्स साधलं आहे. माणसाची करामत पाहून नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत. (man stand on stick maintaining balance magical video went viral on social media)

माणसाने रॉडला जमिनीवर उभं केलंय

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस दिसतोय. हा माणूस अंगाने धष्टपुष्ट आहे. पिळदार शरीर असल्यामुळे तो काहीतरी वेगळं करुन दाखवणार, याची कल्पना आपल्याला सुरुवातीलाच येते. त्याच्या हातात एक लोखंडी रॉड आहे. या रॉडला त्याने जमिनीवर उभं केलं आहे.

कसलाही आधार नसताना तो लोखंडी रॉडवर  चढला

नंतर व्हिडीओतील पिळदार देहयष्टीचा माणूस त्यानेच उभ्या केलेल्या लोखंडी रॉडवर चढतो आहे. दोन्ही पाय रॉडवर ठेवत त्याने रॉड तसेच स्वत:ला उत्तमरित्या सांभाळले आहे. कशाचाही आधार नसताना माणसाने केलेली कमाल पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. उभ्या लोखंडी रॉडवर आडवा होऊन तो हाताची घडी घालून उभा राहिलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओला पाहून नेटकरी अवाक् झाले असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही, मात्र त्याला @HldMyBeer या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

फक्त 5 व्हिडीओ आणि तरी लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर, असं काय आहे ह्या बंगाली यूट्यूब चॅनलमध्ये?

Video | जंगलातून आला, कुंपनात फसला, वाघाच्या डरकाळीने नागरिकांत घबराट

Video | नवरदेव पाहताच नवरी भारावली, केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

(man stand on stick maintaining balance magical video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI